Harbour Railway News: पनवेल- नेरूळ वाशीसह हार्बर मार्गावरील 'ही' स्थानके मध्य रेल्वेकडे जाणार, कारण काय?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेवरील ट्रान्स हार्बर मार्गावर असणाऱ्या दहा स्थानकांचा ताबा लवकरच मध्य रेल्वेला मिळण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सिडको आणि रेल्वे प्रशासनामध्ये विलीनीकरण संदर्भात चर्चा सुरू असून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेवरील ट्रान्स हार्बर मार्गावर असणाऱ्या दहा स्थानकांचा ताबा लवकरच मध्य रेल्वेला मिळण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सिडको आणि रेल्वे प्रशासनामध्ये विलीनीकरण संदर्भात चर्चा सुरू असून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
advertisement
25 वर्षांपूर्वी सिडकोने हार्बर रेल्वे मार्गावरील ही स्थानके उभारली होती. मात्र या स्थानकांच्या देखभाल आणि दुरुस्तीबाबतच्या जबाबदाऱ्या या वरुन दोन्ही संस्थांमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे विलीनीकरण बद्दल हा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, स्थानकांची आवश्यक दुरुस्ती आणि नूतनीकरण झाल्यानंतरच ती नव्या स्वरूपात स्वीकारली जातील.
advertisement
वाशी- पनवेल हार्बर मार्गावर दररोज सुमारे लाखो प्रवासी प्रवास करतात. महत्त्वाच्या स्थानकांमध्ये हार्बर मार्गावरील पनवेल, खांदेश्वर, मानसरोवर, खारघर, बेलापूर, सीवूड- दारावे, नेरूळ, जुईनगर, सानपाडा, वाशी सोबतच ट्रान्स- हार्बरवरील ठाणे- तुर्भे- वाशी या मार्गावरील स्थानकांचाही समावेश करण्यात आला आहे. मध्य रेल्वेकडून ही स्थानकं ताब्यात घेण्यासाठी चर्चा सुरू आहे. चर्चेअंती स्थानकांचा ताबा घेण्यात येणार आहे.
advertisement
या रेल्वे स्थानकांची जशीच्या तशी जबाबदारी घेण्यास सिडकोकडून रेल्वेला सांगण्यात आले आहे. परंतु, रेल्वे स्थानकावर बांधलेल्या इमारती 20- 25 वर्षे जुन्या आहेत. त्यामुळे या इमारतींची आवश्यक देखभाल आणि दुरूस्ती करून त्या नव्याने बांधून हस्तांतरित करण्याचे सांगण्यात आले. हार्बर रेल्वेवरील अनेक स्थानकांची अवस्था फारच बिकट झाली आहे. त्यामुळे अनेकदा प्रवाशांनी सिडकोकडून स्थानकांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार केली.
advertisement
दरम्यान, अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी व्यवस्थित सोय नाही, लाईट, फॅन, पिण्याचे पाणी व्यवस्थित नाही, प्लॅटफॉर्मवरील फरशी तुटलेल्या, भुयारी मार्ग आणि वायूविजनची स्थिती चांगली नाही. तर, प्रकाश आणि वीज व्यवस्थाही अपुरी आहे. त्यामुळे सिडकोकडून रेल्वेने स्थानके ताब्यात घेतल्यास त्यांची देखभाल आणि सुविधांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली आहे. एप्रिल 2025 पासून रेल्वे सिडकोकडे हस्तांतरणासाठी रक्कम जमा करत आहे.