Beed : बीडच्या केजमध्ये नेमका कशावरून राडा झाला? तरुणांनी बसेसची तोडफोड का केली? ग्राऊंड रिपोर्ट
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Kaij Protest: बीडच्या केज तालुक्यातील कोरडेवाडी येथे साठवण तलाव मंजूर करावा या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत होते.
सुरेश जाधव, प्रतिनिधी, बीड: बीडच्या केजमध्ये साठवण तलावाच्या मागणीकरिता सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आक्रमक झालेल्या तरुणांनी एसटी महामंडळाच्या बसेसवर दगफेक करून आपला राग व्यक्त केला. धक्कादायक म्हणजे बसमधील प्रवाशांना दगडफेकीत काही दगड लागल्याने ते जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
बीडच्या केज तालुक्यातील कोरडेवाडी येथे साठवण तलाव करावा या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून अनेक आंदोलने होत आहेत. यामध्ये कोरडेवाडी गावात सध्या आमरण उपोषण सुरू आहे तर गेल्या चार तासांपासून केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अहिल्यानगर-अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन सुरू आहे.
केजमध्ये चार दिवसांपासून आंदोलन, आंदोलकांचे म्हणणे काय?
advertisement
यादरम्यान काही बसेस फोडण्यात आल्या असून एका आंदोलकाने आपल्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत ज्वलनशील पदार्थ ताब्यात घेतले आहे. हे रस्ता रोको आंदोलन अजूनही सुरूच आहे. केजच्या बसस्थानकावर उभ्या असलेल्या अनेक एसटी बसेसवर आंदोलकांनी दगडफेक केली. पोलिसांनी मध्यस्थी करूनही आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. गेल्या चार दिवसांपासून आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलक करतो आहोत, मात्र प्रशासन आम्हाला कोणताच प्रतिसाद देत नाही, असे आंदोलाकांनी सांगितले.
advertisement
केजमध्ये दगडफेक का झाली? एसटी बसेस का फोडण्यात आल्या?
कोरडेवाडी येथे साठवण तलाव व्हावा, अशी आंदोलकांची मागणी आहे, परंतु प्रशासन योग्य प्रतिसाद देत नसल्याने आंदोलकांमध्ये रोष होता. पोलिसांनी मध्यस्थी करूनही आंदोलकांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला. मागणी मान्य होत नसल्याने काही तरूण आक्रमक झाले होते. त्यांनी एसटी महामंडळाच्या बसेसवर दगडफेक केली. दगडफेकीत काही एसटी गाड्यांचे नुकसान झाले असून काही प्रवासी देखील जखमी झाले आहेत. प्रवाशांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, दगडफेकीनंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला. त्यानंतर आंदोलकांची पांगापाग झाली.
view commentsLocation :
Kaij,Bid,Maharashtra
First Published :
October 14, 2025 5:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed : बीडच्या केजमध्ये नेमका कशावरून राडा झाला? तरुणांनी बसेसची तोडफोड का केली? ग्राऊंड रिपोर्ट