Mumbai Rain Update: मुंबईत हवापालट, कोकणाला मुसळधार पाऊस झोडपणार, पाहा आजचं हवामान
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
सलग तीन ते चार दिवसांपासून हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला असून आजही त्याचा परिणाम विशेषतः रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये दिसणार आहे.
पावसाळ्याचा शेवटचा महिना सुरू असताना कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम आहे. सलग तीन ते चार दिवसांपासून हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला असून आजही त्याचा परिणाम विशेषतः रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये दिसणार आहे. मात्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर या जिल्ह्यांना आज कोणताही अलर्ट नाही, त्यामुळे या भागातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळेल.
advertisement
मुंबईत आज अधूनमधून रिमझिम पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मुसळधार पाऊस होण्याची शक्यता कमी असल्यामुळे शहरात वाहतुकीवर किंवा दैनंदिन जीवनावर विशेष परिणाम होणार नाही. दिवसभर वातावरण ढगाळ राहणार असून तापमान किमान 25 अंश सेल्सियस ते कमाल 30 अंश सेल्सियस दरम्यान राहील. वारे पश्चिम-दक्षिण पश्चिमेकडून येतील आणि त्यांचा वेग साधारण 8 ते 12 किमी प्रती तास असेल.
advertisement
advertisement
पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता नसली तरी काही किनारी भागांमध्ये हलक्या सरींचा अनुभव येईल. आज पालघरचे तापमान किमान 25 अंश सेल्सियस तर कमाल 31 अंश सेल्सियस दरम्यान असेल. वारे प्रामुख्याने पश्चिमेकडून येतील आणि त्यांचा वेग 10 ते 18 किमी प्रती तास इतका राहील. किनारी भागात समुद्र थोडा खवळलेला राहू शकतो, त्यामुळे मच्छीमारांनी सावधगिरी बाळगावी.
advertisement
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांना आजही येलो अलर्ट देण्यात आला आहे. येथे अधूनमधून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळपासूनच वातावरण ढगाळ असून दुपारनंतर काही भागांत जोरदार सरी पडू शकतात. तापमान किमान 24 अंश सेल्सियस ते कमाल 30 अंश सेल्सियस राहील. वाऱ्यांचा वेग सरासरी 15 ते 20 किमी प्रती तास असून ते पश्चिम-दक्षिण पश्चिमेकडून येणार आहेत. पावसामुळे काही खेड्यांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी दक्ष राहावे.