समुद्रात जाऊ नका! मुंबईला येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना BMC कडून अलर्ट
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. बृहन्मुंबई महापालिकेने एक निवेदन जारी करून मुंबईकरांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. बृहन्मुंबई महापालिकेने एक निवेदन जारी करून मुंबईकरांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. दिनांक ४ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यान सलग ३ दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा देत समुंद्रकिनारी फिरायला न जाण्याचे आवाहान करण्यात आले आहे.
advertisement
advertisement
यामध्ये भरतीचा दिनांक आणि वेळ यासह भरती दरम्यान समुद्रात उसळणा-या लाटांची उंचीदेखील नमूद करण्यात आली आहे. दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्री १२ वाजून ३९ मिनिटांनी ५.०३ उंचीच्या लाटा उसळणार आहेत. मोठी भरती असण्याच्या सर्व दिवशी भरती कालावधीदरम्यान नागरिकांनी समुद्रकिना-या नजीक जावू नये, तसेच या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे मुंबई पोलिसांद्वारे वेळोवेळी देण्यात येणा-या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाद्वारे नागरिकांना करण्यात येत आहे.
advertisement
advertisement
दिनांक ४ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यानच्या भरतींचे वेळापत्रक... १. गुरुवार, दि. ०४.१२.२०२५ - रात्री – ११:५२ वा.- लाटांची उंची - ४.९६ मीटर २. शुक्रवार, दि. ०५.१२.२०२५ सकाळी – ११:३० वा.- लाटांची उंची - ४.१४ मीटर ३. शनिवार, दि. ०६.१२.२०२५ -मध्यरात्री – १२:३९ वा.-लाटांची उंची - ५.०३ मीटर ४. शनिवार, दि. ०६.१२.२०२५ -दुपारी – १२.२० वा.- लाटांची उंची - ४.१७ मीटर ५. रविवार, दि. ०७.१२.२०२५ -मध्यरात्री – ०१.२७ वा. लाटांची उंची - ५.०१ मीटर ६. रविवार, दि. ०७.१२.२०२५ -दुपारी – ०१.१० वा. लाटांची उंची - ४.१५ मीटर


