IPL टीमनी 5 खेळाडूंना रिटेन केलं, पण आगरकरने सांगितलं T20 वर्ल्ड कपमध्ये जागा नाही!

Last Updated:
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. टी-20 वर्ल्ड कपआधी टीम इंडिया फक्त 2 सीरिज खेळणार आहे, त्यामुळे हीच टीम वर्ल्ड कपमध्येही खेळेल, हे निश्चित मानलं जात आहे.
1/6
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजनंतर टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्धही 5 टी-20 मॅच खेळणार आहे. यानंतर फेब्रुवारी-मार्च महिन्यात टी-20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. त्याआधी या शेवटच्या दोन सीरिज असल्यामुळे टीममध्ये फार बदल होणार नाहीत.

advertisement
2/6
दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी भारतीय टीम : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर

3/6
दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड सीरिजसाठी याच खेळाडूंना संधी दिली गेली तर टी-20 वर्ल्ड कपमध्ये रिंकू सिंगला संधी मिळणार नाही. रिंकू सिंग हा सध्या भारतीय क्रिकेटमधल्या सर्वोत्तम फिनिशरपैकी एक आहे. केकेआरनेही रिंकूच्या याच क्षमतेमुळे त्याला रिटेन केलं आहे.

4/6
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी नितीश कुमार रेड्डीची टीममध्ये निवड झाली, पण आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याला डच्चू देण्यात आला आहे. नितीश कुमार रेड्डी हा बॅटिंगसोबतच मीडियम फास्ट बॉलिंगही करतो. याच ऑलराऊंड क्षमतेमुळे मागच्या काही काळात नितीशला भारताच्या टेस्ट टीममध्येही संधी दिली गेली, पण आता वर्ल्ड कप टीममध्ये त्याची निवड होणं कठीण झालं आहे.

5/6
आयपीएल 2025 मध्ये सर्वाधिक विकेट घेतल्याबद्दल प्रसिद्ध कृष्णाला पर्पल कॅपने गौरवण्यात आलं. गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या प्रसिद्धने आयपीएल 2025 मध्ये 25 विकेट घेतल्या होत्या, पण तरीही च्याची टीम इंडियात निवड झाली नाही.

6/6
आयपीएलमधला सगळ्यात महागडा खेळाडू असलेला ऋषभ पंत 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय टीमचा भाग होता, पण आता मात्र त्याची भारताच्या टी-20 टीममध्ये निवड होत नाहीये. टीममध्ये संजू आणि जितेश हे दोघे विकेट कीपिंगचे पर्याय असल्यामुळे पंतची टी-20 वर्ल्ड कपसाठी निवड होणं मुश्किल आहे.

Beed : 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी झालेल्या पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

View All
advertisement