शेअर बाजारात सुरू झाला Offer For Sale, सरकारचा मोठा डाव; फक्त 54 रुपयांत ‘हॉट’ शेअर्स उपलब्ध
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
OFS for Bank of Maharashtra: सरकारने बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आपली हिस्सेदारी विकण्यासाठी उघडलेल्या OFS ला जबरदस्त प्रतिसाद मिळत असून नॉन-रिटेलकडूनच 400% सब्स्क्रिप्शन झाले. आजपासून रिटेल गुंतवणूकदारांसाठी संधी खुली असून फ्लोर प्राइस फक्त 54 रुपये ठरवण्यात आले आहे.
advertisement
advertisement
जर तुम्ही सामान्य रिटेल गुंतवणूकदार असाल आणि बँक ऑफ महाराष्ट्रच्या OFS मध्ये सहभागी व्हायचे असेल, तर प्रक्रिया अगदी सोपी आहे. सुरुवातीला तुमचे ट्रेडिंग किंवा डीमॅट अकाउंट कोणत्याही ब्रोकरकडे (जसे की Zerodha, Angel, Upstox किंवा कोणताही बँक-ब्रोकर) उघडलेले असणे आवश्यक आहे. लॉगिन केल्यानंतर OFS / Corporate Action हा पर्याय निवडा आणि त्यात Bank of Maharashtra शोधून क्लिक करा.
advertisement
त्यानंतर ‘Retails Category’ निवडणे आवश्यक आहे, कारण रिटेलसाठी खास असा हा दिवस खुला असतो. मग तुम्हाला किती शेअर्स आणि कोणत्या किमतीत घ्यायचे आहेत ते भरावे लागते. किंमत Floor Price म्हणजे किमान निश्चित किंमत किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते, पण त्याखाली नाही. सर्व तपशील अचूक भरल्यानंतर बिड सबमिट करा. यासाठी तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये आवश्यक तेवढी रक्कम आधीच असणे खूप महत्त्वाचे आहे, अन्यथा बिड रिजेक्ट होऊ शकते.
advertisement
रिटेल गुंतवणूकदार अनेक बिड्सही लावू शकतात, म्हणजे वेगवेगळ्या किंमतींवर किंवा वेगवेगळ्या प्रमाणात. जितक्या बिड्स, तितकी अलॉटमेंटची शक्यता वाढते. दिवसभर तुम्ही बिड्स कितीही वेळा बदलू, कमी-जास्त करू शकता. जर OFS मध्ये जास्त बिड्स आल्या आणि ओव्हरसब्स्क्रिप्शन झाले, तर तुम्हाला मागितलेल्या शेअर्सपेक्षा कमी मिळू शकतात. उर्वरित रक्कम IPO प्रमाणेच आपोआप परत येते आणि ती रक्कम पुढच्या दिवशी वापरता येते.
advertisement
सरकार या बँकेतली आपली हिस्सेदारी 5% पर्यंत विकण्याची योजना आखत आहे, ज्यामुळे बँक किमान सार्वजनिक भागभांडवलाच्या नियमांचे पालन करू शकेल. ग्रीन शू ऑप्शन वापरल्यामुळे, रिटेल गुंतवणूकदारांकडून प्रतिसाद चांगला मिळाला तर एकूण 6% हिस्सेदारी विकली जाईल. OFS नंतर सरकारची हिस्सेदारी 79.6% वरून 73.6% पर्यंत कमी होईल. OFS चे फ्लोर प्राइस 54 रुपये ठेवण्यात आले आहे.
advertisement
2025 मध्ये या बँकेच्या शेअर्सने 10.5% वाढ नोंदवली आहे. मंगळवारी हे शेअर्स 57.61 रुपयांवर बंद झाले होते, तर आज (बुधवार) दुपारी 2:08 वाजता ते 1.93% घसरून 56.50 रुपयेवर ट्रेड करत होते. ही संपूर्ण प्रक्रिया व्यवस्थित समजून घेऊन आणि योग्य तपासणी करून रिटेल गुंतवणूकदार या OFS मध्ये सहज सहभागी होऊ शकतात.


