'16 ऑगस्ट 2025 हा सगळ्यात वाईट दिवस, कधीच विसरणार नाही', अखेर जुई गडकरीने मनात दाबून ठेवलेलं सांगून टाकलं!

Last Updated:
Tharla tar Mag Jui Gadkari: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' ने नुकताच १००० भागांचा टप्पा पार केला आहे, पण या सेलिब्रेशनमध्ये मालिकेतील कलाकार एका व्यक्तीला खूप मिस करत आहेत.
1/7
मुंबई: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' ने नुकताच १००० भागांचा टप्पा पार केला आहे, पण या सेलिब्रेशनमध्ये मालिकेतील कलाकार एका व्यक्तीला खूप मिस करत आहेत. ही व्यक्ती म्हणजे 'पूर्णा आजी'ची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर.

advertisement
2/7
१६ ऑगस्ट २०२५ रोजी ज्योती चांदेकर यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सेटवरील वातावरण आजही भावूक असते. मालिकेत 'सायली'ची प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री जुई गडकरीने नुकत्याच एका मुलाखतीत, ज्योती चांदेकर यांच्या आठवणी सांगताना आपले दुःख व्यक्त केले.

3/7
मालिकेचे १००० एपिसोड पूर्ण झाल्याच्या आनंदासोबतच, जुईने तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट आठवण चाहत्यांना सांगितली. जुई म्हणाली,
मालिकेचे १००० एपिसोड पूर्ण झाल्याच्या आनंदासोबतच, जुईने तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट आठवण चाहत्यांना सांगितली. जुई म्हणाली, "मालिकेचे १००० एपिसोड पूर्ण होत आहेत, याचे खूप किस्से आहेत जे मी कधीच विसरू शकत नाही. पण या दरम्यानची सर्वात वाईट आठवण म्हणजे १६ ऑगस्ट २०२५! हा दिवस आयुष्यात मी कधीच विसरणार नाही."
advertisement
4/7
जुई पुढे म्हणाली,
जुई पुढे म्हणाली, "तो दिवस नसता आला तर फार बरं झालं असतं. कारण, आम्हा सगळ्यांचं ज्योती ताईंबरोबर एक खास बॉण्डिंग होतं. ती सर्वांच्या खूप जवळची होती." ज्योती ताईंनी आम्हाला कायमची सोडले, ही बातमी जेव्हा आली, तेव्हा मला काय वाटलं हे मी व्यक्तही करू शकत नाही, असे जुईने सांगितले.
advertisement
5/7
मालिकेत पूर्णा आजी आणि सायलीचे नाते खूप जवळचे दाखवले होते, पण ऑफस्क्रीनही त्यांचे नाते तसेच होते. जुई सांगते,
मालिकेत पूर्णा आजी आणि सायलीचे नाते खूप जवळचे दाखवले होते, पण ऑफस्क्रीनही त्यांचे नाते तसेच होते. जुई सांगते, "माझे आणि ज्योती ताईचे रिलेशन फार वेगळे होते. ती माझ्या खऱ्या आजीसारखी होती आणि माझी खूप चांगली मैत्रीण होती."
advertisement
6/7
जुईने दुःख व्यक्त करत म्हटले की, आज मालिकेचे १००० एपिसोड्स पूर्ण होत आहेत, हे सगळे पाहायला ती हवी होती.
जुईने दुःख व्यक्त करत म्हटले की, आज मालिकेचे १००० एपिसोड्स पूर्ण होत आहेत, हे सगळे पाहायला ती हवी होती. "ती आमच्या मालिकेचा एक अविभाज्य भाग आहे. आजही आम्हाला असं वाटत नाही की ती नाहीये. तिचे आशीर्वाद कायम आमच्याबरोबर असणार आहेत."
advertisement
7/7
ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर मालिकेत पूर्णा आजीच्या भूमिकेसाठी रिप्लेसमेंट आली असली तरी, सेटवरील प्रत्येक कलाकार आजही त्यांना मिस करत असल्याचे जुईच्या बोलण्यातून स्पष्ट होते.
ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर मालिकेत पूर्णा आजीच्या भूमिकेसाठी रिप्लेसमेंट आली असली तरी, सेटवरील प्रत्येक कलाकार आजही त्यांना मिस करत असल्याचे जुईच्या बोलण्यातून स्पष्ट होते.
advertisement
Beed : 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी झालेल्या पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

View All
advertisement