मुंबईत घाटकोपरमधील बिल्डिंगला आग, धुराचे लोट, नागरिकांना इमारतीमधून बाहेर काढण्याचे काम सुरू

Last Updated:

घाटकोपरमधील वसंत विहार इमारतीमधील एका रूमला आग लागली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट असून घटनास्थळी धुराचे मोठे लोट आहेत.

मुंबईत घाटकोपरमधील इमारतीला आग
मुंबईत घाटकोपरमधील इमारतीला आग
संकेत वरक, प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील घाटकोपरमध्ये एका रहिवासी इमारतीला आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशामन दल आणि घाटकोपर पोलीस दाखल झाले आहे. तसेच नागरिकांना इमारतीमधून बाहेर काढण्याचे काम सुरू झाले आहे.
घाटकोपरमधील वसंत विहार इमारतीमधील एका रूमला आग लागली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट असून घटनास्थळी धुराचे मोठे लोट आहेत. आगीची घटना समजताच घटनास्थळी अग्निशामन दल आणि घाटकोपर पोलीस दाखल झाले आहेत.
तसेच इमारतीमधील रहिवाशांना इमारतीमधून खाली काढण्याचे काम सुरू आहे. पुढच्या काही मिनिटांतच नागरिकांचे बचावकार्य पूर्ण होईल, असे अग्निशमन दलाच्या जवानांकडून सांगण्यात आले.
advertisement

कांदिवलीतल्या इमारतीलाही आग

कांदिवली पूर्व येथील ठाकूर व्हिलेजमधील इमारतीला आग लागल्याची माहिती आहे. इमारतीच्या 23व्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळत आहे. आगीचे कराण अद्याप अस्पष्ट असून अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. L1 लेव्हलची आग असल्याचे कळते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुंबईत घाटकोपरमधील बिल्डिंगला आग, धुराचे लोट, नागरिकांना इमारतीमधून बाहेर काढण्याचे काम सुरू
Next Article
advertisement
Beed : 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी झालेल्या पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

View All
advertisement