जखमी झालेल्या, भुकेल्या मोकाट जनावरांची गीतांजली बनली 'आई', 104 प्राण्यांना दिला आसरा!
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
गीतांजली यांचा प्राणीसेवेचा प्रवास एका शेरू नावाच्या कुत्र्यापासून सुरू झाला. पावसात भीजत असताना त्यांनी शेरूला रेस्क्यू करून त्याच्यावर उपचार केले आणि तेव्हापासून प्राण्यांसाठी काहीतरी भव्य करायचं, हा निर्धार त्यांनी मनाशी पक्का केला.
रस्त्यावर भटकणाऱ्या, जखमी, आजारी किंवा अत्याचारग्रस्त प्राण्यांची अवस्था पाहून अनेकांना दया येते, पण काहीच लोक त्यांच्या मदतीसाठी पुढे येतात. पिंपरी-चिंचवडमधील गीतांजली तौर या तरुणीने ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. 2019 साली सुरू केलेल्या ‘साहस’ संस्थेमार्फत त्या गेल्या सहा वर्षांपासून प्राण्यांच्या हक्कांसाठी अविरत लढा देत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement