Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात वारं फिरलं, 4 दिवस हवामानात मोठे बदल, IMD चा अलर्ट काय?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील थंडीचा जोर काही प्रमाणात ओसरण्याची शक्यता असून पुढील 4 दिवस हवामानात मोठे बदल जाणवतील. शुक्रवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
राज्यात थंडीची लाट कमी झाली असली, तरी सकाळच्या वेळी हुडहुडी कायम आहे. आकाश निरभ्र होत असून तापमानात चढ-उतार होत आहेत. पुढील तीन ते चार दिवस किमान तापमानातील वाढ कायम राहील. त्यानंतर पुन्हा गारठा वाढण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. आज 5 डिसेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


