पर्यावरणाशी मैत्री! पुण्यात 2 मित्रांनी उभारलं तब्बल 5 हजार 'झाडांचं घर'
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
अनेकजणांना वृक्षारोपणाची आवड असते. काहीजण घराच्या खिडकीत किंवा अंगणात रोपांची लागवड करतात, तर काहीजण सर्वांना शुद्ध हवा मिळावी, पक्ष्यांना घरटी बांधता यावी, असा व्यापार समाजहिताचा विचार करून सार्वजनिक ठिकाणी वृक्षलागवड करतात. बारामतीच्या 2 पर्यावरणप्रेमी मित्रांनी तर माळरानावर चक्क 5 हजार झाडांची लागवड करून हिरवागार परिसर फुलवलाय. त्यांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होतंय. (प्राची केदारी, प्रतिनिधी / पुणे)
समीर बनकर आणि सागर जाधव या तरुणांनी पुणे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त उंडवडी कडेपठार गावात तब्बल 5 हजार झाडं लावली आहेत. यात लिंब, बोर, जांभूळ, पेरू, चिकू, आवळा, पळस, आंबा, इत्यादी तब्बल 120 प्रकारची विविध रोपं आहेत.
advertisement
advertisement
‘कार्य हीच ओळख’ फाउंडेशनच्या माध्यमातून उंडवडी गावच्या कडेपठार माळरानावर देशी 5 हजार 'झाडांचं घर' तयार करण्यात आलंय. या कामाची सुरूवात 2021 मध्ये झाली होती.
advertisement
महत्त्वाचं म्हणजे देशी झाडांच्या माध्यमातून फुलपाखरू आणि मधमाश्यांना अन्न मिळावं यासाठी पक्ष्यांचा पंगत विभागदेखील तयार करण्यात आला आहे. नैसर्गिक अन्न उपलब्ध झाल्यामुळे इथं पक्ष्यांचा वावरही वाढलाय.
advertisement