बाप्पा मोरया...श्रीमंत दगडूशेठ गणपतीला तब्बल 1100 नारळांचा महानैवेद्य!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
गणेश चतुर्थीनिमित्त राज्यातील विविध गणेश मंदिरांमध्ये सुंदर अशी सजावट केली जाते. बाप्पाला वेगवेगळ्या पदार्थांचा, फळांचा नैवेद्य अर्पण केला जातो. आज, 5 नोव्हेंबर रोजी कार्तिक शुद्ध चतुर्थी तिथीला पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बाप्पाला तब्बल 1100 नारळांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला.
गाणपत्य संप्रदायात कार्तिक शुद्ध चतुर्थी, श्री उमांगमलज जन्मोत्सवात मोरयाला नारळ समर्पित करण्याला विशेष महत्त्व आहे. अंतःकरणातील अहंकाराचं मळभ दूर झाल्यावर शुद्ध, स्वच्छ, प्रशांत स्वरूपातील जे परमात्म दर्शन घडतं, त्याला म्हणतात उमांगमलज. दगडूशेठ गणपती मंदिरात हा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा यानिमित्त श्रींना 1100 नारळांचा महानैवेद्य दाखविण्यात आला.
advertisement
advertisement
advertisement
ट्रस्टचे अध्यक्ष सुनिलभाऊ रासने यांनी यावेळी सांगितलं, 'देवी पार्वतीनं अंगावरच्या मळापासून एक पुतळा बनवला. त्याला जिवंत केलं. पुढे त्याचं आणि शंकरांचं युद्ध झालं. भगवान शंकरांनी त्या मुलाचं मस्तक उडविलं. देवी पार्वतीच्या संतापाला शांत करण्यासाठी शेवटी त्या बालकाच्या धडावर भगवान श्री विष्णूंनी आणलेलं गज मस्तक बसविण्यात आलं. त्यांना श्री गजानन म्हटलं जातं. ही श्री गणेश जन्माची कथा आपण नेहमी ऐकतो. या कथेतील अवतारात भगवान श्री गणेशांचं नाव आहे उमांगमलज.
advertisement
advertisement
advertisement