अन्नपूर्णा देवीचं वरवंट्यासोबत का लावतात लग्न? काय आहे हिंदू विवाहातील हा विधी?

Last Updated:
परळ हा विधी लग्नानंतर सत्यनारायण कथेच्या दिवशी सत्यनारायण झाल्यानंतर लगेच केला जातो.
1/7
हिंदू धर्मात विवाह हा एक संस्कार मानला जातो. विवाहात अनेक विधी केले जातात. यातीलच एक म्हणजे लग्नानंतर केला जाणारा परळ विधी होय. हे विधी अजूनही केले जातात.

advertisement
2/7
 अनेकांना याबाबत माहिती नसते. तरीही परंपरा म्हणूनच हे विधी केले जातात. मात्र, लग्नानंतर हा विधी का केला जातो? कधी केला जातो? आणि काय महत्त्व आहे? हेच आपण <a href="https://news18marathi.com/maharashtra/wardha/">वर्धा</a> येथील पंडित हेमंतशास्त्री पाचखेडे यांच्याकडून जाणून घेणार आहोत.

3/7
लग्नानंतर वर वधूच्या घरच्यांनी परळ ही विधी करून घ्यावी. परळ म्हणजे अन्नपूर्णा देवीची शांती होय. शब्दशः परळ म्हणजे पात्र होय. हा एक कुळाचार असतो. जो सर्व समाजातील कुटुंबाने करायला पाहिजे.

4/7
जास्तीत जास्त 21 पात्र वाढायचे असतात. पात्र वाढल्यानंतर सर्वांच्या मधात शिवपिंड स्थापन करतात किंवा कोणाच्या घरीपाटा वरवंटा ही ठेवतात. त्याचं अन्नपूर्णा सोबत लग्न लावतात. अन्नपूर्णा देवी आपल्यावर प्रसन्न राहावी हा त्यामागचा उद्देश असतो.

5/7
आपल्याकडे लग्नात अनेक लोकं येतात. तेव्हा लोकांना जेवण दिले जाते. त्यात अनेकजण उष्टं टाकतात. अशाने अन्नपूर्णा नाराज होते. त्यामुळे हा विधी केला जातो, असं पाचखेडे महाराज सांगतात.

6/7
हा विधी लग्नानंतर सत्यनारायण कथेच्या दिवशी सत्यनारायण झाल्यानंतर लगेच केला जातो. सत्यनारायण आणि अन्नपूर्णा देवीला नैवेद्य दाखवून नमस्कार करावा. आता पात्रावर कोणी बसावे? तर, पहिला मान गुरुजींचा असतो. त्यानंतर घरातील म्हणजेच कुळातील सर्व मुलांनी किंवा सर्व पूरुषांनी बसायचं असतं.

7/7
पात्रात कच्चा पापड आणि पुरणाचा दिवा लावावा. त्यानंतर मग 5 मंगलाष्टके आणि अन्नपूर्णादेवीची आरती आणि शंकराची आरती केली जाते. अशाप्रकारे ही विधी पार पडते, अशी माहिती पंडित हेमंत शास्त्री पाचखेडे यांनी दिली.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement