Vastu Tips: कशाचाच कशाला ताळमेळ लागत नाही! घरात कधीही रिकाम्या ठेवू नये या 4 गोष्टी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu Tips Marathi: घरात वास्तुशास्त्राचे नियम पाळण्याकडे अनेकांचा कल असतो. वास्तुशास्त्रानुसार, घर किंवा दुकानामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर तेथे नेहमी नकारात्मक ऊर्जा राहते, ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात प्रगती आणि सुख-समृद्धीची कमतरता असते, असे मानले जाते. याउलट वास्तुदोष नसेल तर तेथे देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते.
वास्तुशास्त्रात दिशानिर्देशांव्यतिरिक्त अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या नसल्या तरी घरात वास्तुदोष आणि दारिद्र्य राहते. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये अशा काही गोष्टी आहेत, ज्या रिकाम्या ठेवल्यास वास्तुदोष निर्माण होतात आणि प्रगतीमध्ये अडचणी निर्माण होतात. जाणून घेऊया त्या कोणत्या गोष्टी आहेत.
advertisement
पर्स आणि तिजोरी कधीही रिकामी ठेवू नये- तुमच्या तिजोरीत आणि पाकिट-पर्समध्ये नेहमी भरपूर पैसे असावेत, असे तुम्हाला वाटत असेल तर वास्तुशास्त्राचा एक नियम पाळला पाहिजे. वास्तूनुसार तिजोरी किंवा पर्स कधीही रिकामी ठेवू नये. त्यात नेहमी काही पैसे ठेवले पाहिजेत. वास्तूनुसार तिजोरी किंवा पाकिट पूर्णपणे रिकामी असल्यास देवी लक्ष्मीचा कोप होतो, असे मानले जाते.
advertisement
advertisement
देवघरात पाण्याचे भांडे रिकामे ठेवू नये - घरातील देव्हारा हा सर्वात विशेष भाग आहे. वास्तुशास्त्रानुसार देवघरात ठेवलेले पाण्याचे भांडे कधीही रिकामे ठेवू नये. तसं करणं अशुभ मानलं जातं. पाण्याच्या पात्रात काही पाणी, गंगाजल आणि तुळशीची पाने नेहमी असावीत. या उपायाने तुमच्या घरावर देवाची कृपा कायम राहते. यामुळे सुख समृद्धी मिळते.
advertisement
बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवू नका - वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये रिकामी बादली कधीही ठेवू नये. ज्या घरांमध्ये बाथरुममध्ये रिकामी बादली ठेवली जाते, त्या घरांमध्ये नकारात्मक ऊर्जा खूप लवकर प्रवेश करते. याशिवाय बाथरूममध्ये काळी किंवा तुटलेली बादली कधीही वापरू नये. असे केल्याने घरातील आर्थिक समस्यांसोबतच वास्तुदोष निर्माण होतात.
advertisement
धान्याचे कोठार (डबा) - धान्य ठेवण्याचा डबा किंवा इतर आपण वापरत असेलेली वस्तू कधीही रिकामी ठेवू नये. देवी अन्नपूर्णेचा आशीर्वाद स्वयंपाकघरात ठेवलेल्या या भांड्यावर राहतो. धान्याचा डबा रिकामा नसावा. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते.(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)










