Vastu Tips: शूज-चप्पल खरेदीसाठी हा दिवस टाळावा, 90% लोक करतात चूक, त्यासोबत घरी आणतात दारिद्र्य
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu Tips For Shoes: दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी वास्तुशास्त्रात नियम आहेत. या नियमांच्या विरोधात जाणं एखाद्या व्यक्तीला अडचणीत आणू शकतं. आपलं नशीब आणि दुर्दैव काही गोष्टींच्या खरेदीशी देखील संबंधित आहे. शूज किंवा चप्पल खरेदी करणं त्यापैकी एक मानलं जातं. वास्तुशास्त्रात अशा काही दिवसांचा उल्लेख आहे ज्यादिवशी शूज किंवा चप्पल खरेदी करून घरी आणणे अशुभ मानले जाते. ज्योतिषी डॉ. गौरव कुमार दीक्षित यांच्याकडून जाणून घेऊया, कोणत्या दिवशी शूज आणि चप्पल खरेदी करू नयेत.
कोणत्या दिवशी शूज-चप्पल खरेदी करू नये: सर्वसाधारणपणे कोणताही व्यक्ती आपल्या सोयीनुसार आणि गरजेनुसार शूज-चप्पल खरेदी करतो, त्यासाठी दिवस किंवा शुभ मुहूर्त पाहिला जात नाही. परंतु, वास्तुशास्त्रानुसार अमावस्या, मंगळवार, शनिवार किंवा ग्रहणाच्या दिवशी शूज आणि चप्पल खरेदी करणे टाळावे. या दिवशी खरेदी केलेल्या शूज-चप्पलमुळे घरात दारिद्र्य येऊ शकतं. (इमेज-कॅनव्हा)
advertisement
या दिवशी शूज आणि चप्पल का खरेदी करू नयेत : ज्योतिष शास्त्रानुसार शनीचा संबंध पायाशी मानला जातो, त्यामुळे शनिवारी शूज आणि चप्पल खरेदी करू नये, असे सांगितले जाते. शनिवारी शूज आणि चप्पल खरेदी केल्याने व्यक्तीवर शनिदोष येतो. यामुळे शनिदेवाची व्रकदृष्टी पडल्यानं घरात दुःख आणि गरिबी येते, असे मानले जाते. (इमेज-कॅनव्हा)
advertisement
advertisement
advertisement
येथे शूज आणि चप्पल ठेवू नका : वास्तुशास्त्रानुसार चुकूनही तुम्ही ज्या पलंगावर झोपत आहात त्याखाली शूज आणि चप्पल ठेवू नयेत. असे केल्याने पलंगावर झोपलेल्या व्यक्तीच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो आणि पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. (इमेज-कॅनव्हा)(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)