Team India : 'आगरकर-गंभीरने उद्ध्वस्त केलं भारतीय क्रिकेट', एक-एक करून 9 दिग्गजांचं करिअर संपवलं!

Last Updated:
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाचा 2-0 ने लाजिरवाणा पराभव झाला आहे. घरच्या मैदानात झालेला हा पराभव भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या जिव्हारी लागला आहे. यानंतर प्रशिक्षक गौतम आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर चाहत्यांच्या निशाण्यावर आले आहेत.
1/10
टेस्ट क्रिकेटसाठी स्पेशलिस्ट बॅटर आणि स्पेशलिस्ट बॉलर घेऊन खेळण्याऐवजी आगरकर आणि गंभीर ऑलराऊंडरना घेऊन खेळत आहेत. या रणनीतीमुळे भारतीय क्रिकेटमधल्या 9 दिग्गज क्रिकेटपटूंचं करिअर धोक्यात आलं आहे. अजित आगरकर हा सिलेक्टर नसून रिजेक्टर असल्याची टीका चाहते करत आहेत.

advertisement
2/10
हार्दिक पांड्याकडे भारताचा पुढचा टी-20 कर्णधार म्हणून पाहिलं जात होतं. रोहित शर्माच्या गैरहजेरीत हार्दिक पांड्याने टीमचं नेतृत्व केलं, पण रोहितच्या निवृत्तीनंतर हार्दिक पांड्याऐवजी सूर्यकुमार यादवकडे टीमचं नेतृत्व देण्यात आलं.

3/10
प्रथम श्रेणी क्रिकेट गांभिर्याने घेत नसल्याचा आरोप करत श्रेयस अय्यरला भारताच्या टेस्ट टीममधून डच्चू दिला गेला. तसंच आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करूनही श्रेयस अय्यरची भारताच्या टी-20 टीममध्ये निवड झाली नाही. अखेर श्रेयस अय्यरनेही फिटनेसच्या कारणास्तव टेस्ट क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला आहे.

4/10
श्रेयस अय्यरप्रमाणेच इशान किशनलाही ब्रेक मागितल्याचा आणि प्रथम श्रेणी क्रिकेटला गांभिर्याने न घेतल्याचा फटका बसला. सततच्या प्रवासामुळे इशान किशनने टीम मॅनेजमेंट आणि निवड समितीकडे ब्रेक मागितला, पण त्यानंतर वनडे क्रिकेटमध्ये डबल सेंच्युरी करणारा इशान किशन टीममधून बाहेरच झाला.

5/10
रणजी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतरही सरफराज खानची टीम इंडियात उशिरा निवड झाल्याबद्दल टीका करण्यात आली होती. पण निवड झाल्यानंतर सरफराजने न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्टमध्ये 150 रनची खेळी केली होती. या कामगिरीनंतरही सरफराज खान अचानक टीम इंडियातून गायब झाला.

6/10
अभिमन्यू इश्वरन 2020-21 पासून भारतीय टीमसोबत होता, परदेशातल्या लागोपाठ 10 टेस्ट मॅचमध्ये इश्वरनला बेंचवरच बसवलं गेलं आणि इंग्लंड दौऱ्यानंतर अचानक त्याला टीममधून बाहेर केलं गेलं.

7/10
रिंकू सिंगने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे, पण त्याच्यावर टी-20 स्पेशलिस्ट खेळाडू असाच शिक्का मारला गेला, असं असूनही रिंकू सिंगला भारताच्या टी-20 टीममध्येही जागा मिळत नाही.

8/10
संजू सॅमसनने टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये ओपनर म्हणून धमाकेदार कामगिरी केली, पण शुभमन गिलची टीममध्ये एन्ट्री होताच संजूला खालच्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवलं गेलं, त्यानंतर त्यालाही बाहेरचा रस्ता दाखवला गेला.

9/10
ऋतुराज गायकवाडही स्थानिक क्रिकेटमधल्या जवळपास सगळ्या स्पर्धा खेळून मोठ्या रन करत आहे, पण मागची दोन वर्ष त्याचा टीम इंडियासाठी विचार झाला नाही. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये गिल आणि श्रेयस दुखापतग्रस्त असल्यामुळे ऋतुराजला संधी दिली गेली आहे.

10/10
मोहम्मद शमी आणि अजित आगरकर यांच्यात मागच्या काही काळापासून वाद सुरू आहेत. बंगालकडून रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना मोहम्मद शमी विरोधी टीमला घाम फोडत आहे, पण तरीही अजित आगरकरने शमीच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. फिटनेसमुळे शमीची टीम इंडियात निवड होत नसल्याचं आगरकर म्हणाला.

Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement