Dharmendra Property : पैसा नको, बंगलाही नको, धर्मेद्रच्या 450कोटींच्या प्रॉपर्टीतून आहानाला हवीये फक्त ही एकच गोष्ट
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Dharmendra Property : धर्मेंद्र यांची धाकटी मुलगी अहाना देओल हिचाही धर्मेंद्र यांच्या 450 कोटींच्या प्रॉपर्टीमध्ये समान हक्क आहे. पण गाडी, बंगल्यापेक्षा आहानाला धर्मेंद्र यांच्या संपत्तीमधील फक्त एकच वस्तू हवी आहे. ती कोणती?
advertisement
धर्मेंद्र आता या जगात नाहीत पण त्यांनी 450 कोटी रुपयांची अफाट संपत्ती मागे सोडली आहे. धर्मेंद्र यांच्या संपत्तीवर त्यांची पहिली पत्नी आणि सहा मुलांचा हक्का आहे. हेमा मालिनी यांना संपत्तीचा हिस्सा मिळणार नाही अशा चर्चा आहेत. या सगळ्यात हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची धाकटी मुलगी अहाना देओलला तिच्या वडिलांच्या संपत्तीतून काय हवे हे तिने स्वत: सांगितलं होतं.
advertisement
24 नोव्हेंबर 2025 रोजी धर्मेंद्र यांचं निधन झालं. त्यांनी आपल्या 6 दशकांच्या कारकिर्दीत खूप मोठी संपत्ती निर्माण केली. त्यांचं मोठं कुटुंब असल्याने त्यांच्या संपत्तीचं पुढे काय होणार अशा चर्चा पाहायला मिळत आहेत. अशातच त्यांची मुलगी अहानाने एका जुन्या मुलाखतीत वडिलांच्या संपत्तीविषयी केलेलं एक वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं आहे. अहानाला वडिलांची मालमत्ता नाही तर वारसा हक्क म्हणून एक खास गोष्ट हवी आहे.
advertisement
advertisement
धर्मेंद्र यांनी 1980 मध्ये हेमा मालिनी यांच्याशी लग्न केलं. दोघांना ईशा आणि अहाना या दोन मुली झाल्या. धर्मेंद्र त्यांच्या दोन्ही मुलींबाबत खूप इमोशनल होते. वडिलांबद्दल एका मुलाखतीत बोलताना आहाना म्हणाली होती, "माझे वडील मला नेहमीच प्रेमळ राहण्यास शिकवत. त्यांनी मला आनंदी, निरोगी आणि मजबूत राहण्याचा सल्ला दिला. हे ऐकायला सोपं वाटतं पण त्याचा अर्थ खूप खोल आहे."
advertisement
जेव्हा अहाना देओलला विचारण्यात आले की तिला तिच्या वडिलांकडून काय वारसाहक्काने मिळवायचे आहे, तेव्हा तिने पैसे, प्रसिद्धी किंवा लक्झरीबद्दल विचार केला नाही. आणि तिच्या उत्तराने सर्वांना आश्चर्यचकित केले. क्षणाचाही विलंब न करता ती म्हणाली, "मला माझ्या वडिलांची पहिली कार, त्यांची फियाट, वारसाहक्काने मिळवायची आहे."
advertisement
advertisement
आहानाने वडिलांच्या कारशी संबंधित एक किस्सा सांगितला. ती म्हणाली "मी सहा वर्षांची होते तेव्हा ते लोणावळा येथील त्यांच्या शेतात जात होते. जाण्यापूर्वी ते निरोप देण्यासाठी थांबले. मी अचानक म्हणाले, 'मीही येईन...' आणि ते इतके अचानक घडले की त्यांनी माझे सामान पॅक केले आणि मला त्यांच्यासोबत घेऊन गेआम्हाला ले. त्यांनी मला गाडीत त्यांच्या मांडीवर बसवलं. त्यांच्यासोबतच्या माझ्या सर्वात गोड आठवणींपैकी ही एक आहे. मी ती नेहमीच लक्षात ठेवेन."


