MS Dhoni नाही तर राजस्थानच्या 'या' दोन खेळाडूंवर ऋतुराजने फोडलं पराभवाचं खापर, म्हणतो 'तिथंच आम्ही चुकलो...'

Last Updated:
Ruturaj Gaikwad Statement On CSK vs RR : आयपीएलच्या 11 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून यंदाच्या आयपीएलचं खातं उघडलं आहे. तर सीएसकेने सलग दोन पराभव स्विकारले आहेत. अशातच कॅप्टन ऋतुराज काय म्हणतो? पाहा
1/7
पॉवर प्लेमध्ये आम्ही चांगली कामगिरी करू शकलो नाही. नितीश चांगला खेळत होता, पण आम्ही त्याला रोखू शकलो नाही. आम्ही क्षेत्ररक्षणामध्येही काही सोप्या चुका केल्या, ज्यामुळे 8-10 धावा जास्त गेल्या. पण आम्ही त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहोत, असं ऋतुराज गायकवाड याने म्हटलं आहे.

advertisement
2/7
180 धावांचं लक्ष्य गाठण्यासारखं होतं. खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती. त्यामुळे तिथे चांगले शॉट्स खेळता आले असते. पहिल्या डावाअखेर मला वाटलं होतं की आम्ही जिंकू. ते 210 पर्यंत पोहोचतील असं वाटत होतं, पण 180 पर्यंत ठीक होतं, असंही ऋतुराज म्हणाला.

3/7
आपल्या तिसऱ्या क्रमांकावरच्या फलंदाजीबद्दल देखील ऋतुराजने भाष्य केलं. गेल्या काही वर्षांपासून अजिंक्य तिसऱ्या क्रमांकावर खेळत होता आणि रायडू मधल्या षटकांमध्ये चांगली फलंदाजी करत होता. त्यामुळे मी थोडा उशिरा यावं आणि मिडल ओव्हर सांभाळावी असं वाटलं.

4/7
त्रिपाठीने वरच्या क्रमांकावर आक्रमक फलंदाजी करावी असं आम्हाला वाटलं. पण खरं सांगायचं तर, मी लवकर बाद झालो, त्यामुळे काही फरक पडला नाही. हे सगळं लिलावाच्या वेळी ठरलं होतं, असंही ऋतुराज गायकवाडने म्हटलं आहे.

5/7
मला त्यात काही अडचण नाही. मी गरज पडेल तेव्हा धोका पत्करू शकतो आणि एके-दोन धावाही घेऊ शकतो. दुर्दैवाने, आम्हाला चांगली सुरुवात मिळत नाहीये, पण एकदा ती मिळाली की गोष्टी बदलतील, असं म्हणत ऋतुराजने त्रिपाठीला वॉर्निंग दिली आहे.

6/7
नूर नेहमीप्रमाणेच चांगली गोलंदाजी करत आहे, खलीलही चांगली गोलंदाजी करत आहे आणि जड्डू भाईनेही चांगली गोलंदाजी केली. गोलंदाजी विभागात थोडा आत्मविश्वास असणे आवश्यक आहे, असं मत ऋतुराजने व्यक्त केलंय.

7/7
मला वाटतं की एकदा का सर्व काही जुळून आलं आणि आम्हाला आत्मविश्वास मिळाला की आम्ही एक खूप चांगली टीम बनू, असं म्हणत ऋतुराजने आगामी सामन्यात सुधारणा करू, असं आश्वासन दिलं आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement