अँड्रॉइड फोनवर नव्या मालवेयरचा धोका! OTP शिवायही बँक अकाउंट होईल हॅक
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
अँड्रॉइड यूझर्सना एका नवीन मालवेअरबद्दल अलर्ट राहावे लागणार आहे. कारण याच्या मदतीने हॅकर्स कोणत्याही ओटीपीशिवाय तुमचे बँक अकाउंट अॅक्सेस करण्यास आणि OTP शिवाय ट्रांझेक्शन करण्यास परवानगी देते.
advertisement
advertisement
कशी मिळाली याची माहिती? : अँड्रॉइड बँकिंग मालवेअरवर लक्ष ठेवणारी कंपनी क्लेफीने हे मालवेअरविषयी माहिती मिळवली आहे. कंपनीला अनेक प्रकरणांमध्ये असाच प्रकार आढळला. हल्लेखोर व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम सारख्या अॅप्सद्वारे लोकांना मलेशियन APK फाइल्स पाठवतात. ते लोकांना डिस्काउंट किंवा इतर ऑफरचे आश्वासन देऊन या फाइल्स इन्स्टॉल करण्यासाठी आमिश देतात.
advertisement
advertisement
हे मालवेअर बँकिंग अॅप्सना टार्गेट करते : फोनवर अॅक्टिव्हेट झाल्यानंतर, हे मालवेअर बँकिंग, डिजिटल पेमेंट, फिनटेक आणि क्रिप्टो अॅप्सना टार्गेट करते. ते पासवर्ड चोरत नाही तर अ‍ॅप्सद्वारे थेट ट्रांझेक्शन करते. ही संपूर्ण प्रोसेस बॅकग्राउंटमध्ये चालते आणि यूझर्सना कोणत्याही सूचना मिळत नाहीत आणि हॅकर्सना पैसे चोरण्यासाठी OTP ची आवश्यकता नसते.
advertisement
advertisement


