66,600km वेगाने येतेय पृथ्वीच्या दिशेनं विघ्न, अंतराळामध्ये हायअलर्ट, NASA ने केली डेंझर म्हणून नोंद!
- Published by:Sachin S
Last Updated:
बऱ्याच वेळा हे लघुग्रह छोटे असल्यामुळे पृथ्वीच्या कक्षेत येण्याआधीच उद्ध्वस्त होऊन जातात. पण आता पृथ्वीशी थेट संबंध असणारी एक घटना घडली आहे.
अंतराळामध्ये नेहमी वेगवेगळ्या घडामोडी घडत असतात. अशावेळी पृथ्वीच्या दिशेनं बऱ्याच वेळा लघुग्रहाचं संकट येत असतं. बऱ्याच वेळा हे लघुग्रह छोटे असल्यामुळे पृथ्वीच्या कक्षेत येण्याआधीच उद्ध्वस्त होऊन जातात. पण आता पृथ्वीशी थेट संबंध असणारी एक घटना घडली आहे. एक धोका सध्या जगभरातील शास्त्रज्ञांसाठी चिंतेचा विषय आहे. हा धोका म्हणजे, पृथ्वीकडे सरकणारी एक महाकाय उल्कापिंड. जरी विश्वात अनेक उल्कापिंड असले तरी, नासाने या उल्कापिंडला धोकादायक वस्तूंच्या यादीत ठेवलं आहे.
advertisement
[caption id="attachment_1369672" align="alignnone" width="750"] यावेळी, असा महाकाय उल्कापिंड अवकाशात घिरट्या घालत आहे, ज्याबद्दल नासानेही चिंता व्यक्त केली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या उल्कापिंडीचा वेग ताशी ६६,६०० किमी आहे आणि तो १९० फुटांपेक्षा जास्त प्रचंड आहे. शास्त्रज्ञ त्यावर लक्ष ठेवून आहेत आणि त्याच्या प्रत्येक हालचालीचा अभ्यास केला जात आहे कारण तो पृथ्वीच्या अगदी जवळून जाईल.</dd>
<dd>[/caption]
advertisement
महाकाय उल्कापिंड किती मोठी? या लघुग्रहाची लांबी सुमारे १९० फूट (५८ मीटर) आहे, जी एका बहुमजली इमारतीइतकी आहे. ती सध्या अवकाशात सुमारे ४१,३९० मैल म्हणजेच ताशी ६६,६०० किलोमीटर वेगाने फिरत आहे. या लघुग्रहाचे नाव २०२५ PM२ आहे. हा आपल्यासाठी चिंतेचा विषय आहे कारण, अंतराळ संस्था नासाने त्याचे वर्णन संभाव्य धोका म्हणून केलं आहे. हा उल्कापिंड चंद्रापासून पृथ्वीच्या अंतराच्या फक्त १० पट अंतरावरून जाईल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


