Badlapur : शहराचं नाव बदलापूर कसं पडलं? नावामागची कहाणी माहितीय का?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुम्हाला माहितीय का की बदलापूर या शहराचा इतिहास आहे. शिवाय त्याच्या नावाची देखील एक कहाणी आहे. जी फारच कमी लोकांना माहित आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पेशवेकाळात बदलापूरपासून सुमारे सहा किलोमीटर लांब आणि बारवी नदीच्या जवळ असलेले चोण हे परगण्याचे मुख्य ठिकाण होते. काही पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये ‘मौजे बदलापूर उर्फ चोण’ असा उल्लेख आढळतो. सन 1738-39 च्या सुमारास रामचंद्र हरी पटवर्धन यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात ‘मुक्काम बदलापूर’ असे लिहिल्याचा उल्लेख आढळतो.
advertisement
advertisement
वसईच्या मोहिमेतून वाघोलीला जात असताना सरदार पिलाजीराव जाधवांचा मुक्काम बदलापूर येथे होता, अशी नोंद एका पत्रात आहे. दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात पेशव्यांच्या सरदारांनी कॅप्टन गॉडार्ड आणि हॉर्टलेचा पराभव कुळगाव, बदलापूरच्या आसपास केला होता. कागदोपत्री पेशव्यांच्या काळात बदलापूरचे महत्त्व वाढायला सुरुवात झाली, असे दिसून येते.








