Bermuda Triangle : बर्म्युडा ट्रँगलखाली सापडलं असं काही शास्त्रज्ञही हैराण; अखेर रहस्य उलगडणार?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bermuda Triangle : शास्त्रज्ञांना बर्म्युडा बेटांच्या खाली खोलवर एक अशी रचना सापडली आहे, जी पृथ्वीवर यापूर्वी कधीही कुठेही दिसली नाही.
बर्म्युडा ट्रँगल... जिथं विमानं आणि जहाजं रहसयमयी गायब होतात. आता याच ठिकाणाबाबत एक वेगळाच प्रकार उघडकीस आला आहे. शास्त्रज्ञांना बर्म्युडा ट्रँगलच्या खाली असं काही सापडलं आहे, की तेसुद्धा आश्चर्यचकीत झाले आहेत. शास्त्रज्ञांना बर्म्युडा बेटांच्या खाली खोलवर एक अशी रचना सापडली आहे, जी पृथ्वीवर यापूर्वी कधीही कुठेही दिसली नाही. या शोधामुळे रहस्य आणखी वाढलं आहे.
advertisement
advertisement
शास्त्रज्ञांनी बर्म्युडामधील भूकंप केंद्राचा वापर करून जगभरातील मोठ्या भूकंपांच्या रेकॉर्डिंगचा अभ्यास केला. भूकंपाच्या लाटांमध्ये अचानक झालेल्या बदलांमुळे शास्त्रज्ञांना पृथ्वीच्या सुमारे 50 किलोमीटर अंतरावर डोकावता आलं, ज्यामुळे खडकाचा हा असामान्य, कमी दाट पण जाड थर उघड झाला. हा अनोखा खडक दर्शवतो की काही रहस्ये फक्त समुद्राच्या पृष्ठभागावरच नाही तर त्याच्या खोलीत देखील लपलेली आहेत.
advertisement
भूकंपशास्त्रज्ञ आणि अभ्यासाचे प्रमुख लेखक डॉ. विल्यम फ्रेझर यांनी सांगितलं की, इतका जाड आणि हलका खडकाचा थर जगात इतर कुठेही नोंदवला गेला नाही. बर्म्युडा एका महासागरीय कड्यावर वसलेला आहे, जिथं महासागरीय कवच त्याच्या सभोवतालच्या भागांपेक्षा अंदाजे 500 मीटर उंच आहे, तरीही इथं 31 दशलक्ष वर्षांपासून ज्वालामुखी झालेला नाही. बर्म्युडाचे ज्वालामुखी सुमारे 31 दशलक्ष वर्षांपूर्वी नष्ट झाले. सामान्यतः, जेव्हा कवच एखाद्या अतिउष्ण स्थळापासून दूर जातं तेव्हा फुगवटा नाहीसा होतो, पण बर्म्युडाचा फुगवटा आजही कायम आहे. शास्त्रज्ञांसाठी हे सर्वात आश्चर्यकारक आहे. हा प्रश्न या शोधाला आणखी गूढ बनवतो.
advertisement
आता या नव्या शोधामुळे बर्म्युडा ट्रँगलचं गूढ उलगडेल का? तर हा शोध जहाजं किंवा विमानं गायब होण्याशी थेट जोडलेला नाही, असं शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं आहे. तरी तरी ही नवीन रचना बर्म्युडा प्रदेश भौगोलिकदृष्ट्या इतका अद्वितीय का आहे हे स्पष्ट करण्यास मदत करू शकते. हा शोध बर्म्युडा त्रिकोणाभोवतीच्या लोककथा आणि विज्ञान यांच्यातील दरी निश्चितच भरून काढतो.








