Chicken vs Mutton Liver: चिकन लिव्हर की मटण लिव्हर, आरोग्यासाठी कोणतं चांगलं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Chicken Liver vs Mutton Liver : चिकन लिव्हर आणि मटण लिव्हर नॉनव्हेजप्रेमी दोन्ही प्रकारचे लिव्हर खातात. पण दोन्ही लिव्हरमध्ये कोणते पोषक घटक असतात, कोणाचं लिव्हर आपल्या आरोग्यासाठी चांगलं याबाबत सविस्तर माहिती.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मटण लिव्हर व्हिटॅमिन बी 12 चा उत्तम स्रोत आहे. जे नियमितपणे ते खातात त्यांच्या मेंदूचं कार्य चांगलं होतं. संज्ञानात्मक कौशल्यंदेखील वाढतं. हे सूक्ष्म अन्नद्रव्य मज्जासंस्थेला उत्तेजित करतं. मटण यकृतामध्ये असलेले व्हिटॅमिन ए, फोलेट आणि इतर जीवनसत्त्वे रोग प्रतिकारशक्ती वाढवतात आणि संपूर्ण आरोग्य राखतात.
advertisement
advertisement
चिकन आणि मटण यकृत दोन्ही संतुलित आहारात समाविष्ट केले जाऊ शकतात. पण यामध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण जास्त असतं. म्हणून ते कमी प्रमाणात खावं. कोलेस्ट्रॉल, किडनी, स्नायूशी संबंधित समस्या असलेले लोक, गरोदर महिला, स्तनदा मातांनी मटण लिव्हर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खावं. तर चिकन लिव्हर आठवड्यातून एक किंवा दोनदा खाणं ठीक आहे, पणते नियमितपणे खाणे चांगलं नाही.