संध्याकाळी 5.30 नंतर एक माणूसही दिसणार नाही, भारतातील झपाटलेलं रेल्वे स्टेशन
- Published by:Devika Shinde
Last Updated:
इथून रात्रीच्या वेळी ट्रेन गेली तरी प्रवासी खिडक्या बंद ठेवतात. या स्टेशनला पाहणे हा एक भयावह अनुभव असल्याचे सांगितले जाते.
रेल्वेचा प्रवास जवळजवळ प्रत्येकानेच केला असेल. हा प्रवास कमी खर्चीक आणि आरामदायी असतो. ट्रेन आपल्याला वेळेवर पोहोचण्यासाठी मदत करते. तुम्ही ट्रेनने लांबचा प्रवास नक्कीच केला असेल. यामध्ये ट्रेनचे मार्ग ठरवून दिलेले असतात, त्या मार्गाने ट्रेन जाते आणि ठरावीक अंतराने, ठराविक वेळेसाठी ती त्या स्टेशनवर थांबते.
advertisement
या स्टेशनवर काही प्रवासी उतरुन आपल्या मार्गाने जातात, तर काही आपल्याला खाण्यापिण्यासाठी गोष्टी विकत घेतात. पण तुम्हाला माहितीय का की जगात असं एक स्टेशन आहे, जिथे लांब-लांबपर्यंत माणसं दिसत नाही. शिवाय इथून रात्रीच्या वेळी ट्रेन गेली तरी प्रवासी खिडक्या बंद ठेवतात. या स्टेशनला पाहणे हा एक भयावह अनुभव असल्याचे सांगितले जाते.
advertisement
advertisement
संध्याकाळ होताच येथे शांतता पसरली असते. तसेच ग्रामस्थ देखील या बाजूला येणं टाळतात. पण असं का? चला जाणून घेऊ गावकरी काय सांगतात. बेगुनकोदर रेल्वे स्थानक 1960 मध्ये सुरू झाले. मात्र सात वर्षानंतर ते बंद करावे लागले. 2007 मध्ये ग्रामस्थांनी तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून स्टेशन सुरू करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर हे स्थानक सुरू करण्यात आले. स्टेशन सुरू झाले पण आजही हे स्टेशन भूताचा अड्डा समजले जाते. या स्थानकाच्या आजूबाजूच्या इमारतीही पूर्णपणे निर्जन आहेत.
advertisement
स्थानकाला प्लॅटफॉर्म नाही, तसेच याच्या एका कोपऱ्यात फक्त 12 बाय 10 फूट तिकीट काउंटर बनवले आहे. भूतामुळे रस्त्यावर गाडीला अपघात? व्हिडीओचं रहस्य अखेर समोर रेल्वे कर्मचाऱ्यानेही पाहिले भूत बेगुनकोदर कोलकात्यापासून 260 किमी अंतरावर आहे. हे स्थानक सुरू करण्यात संथाल जमातीतील राणी लचन कुमारी यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे सांगण्यात येते. लचन कुमारी यांनी स्टेशनसाठी रेल्वेला भरघोस अनुदान दिले होते.
advertisement
हे स्टेशन सुरू करण्यामागचा उद्देश त्यांच्या समाजातील लोकांचे जीवनमान सुधारणे हा होता. स्टेशन सुरू झाल्यानंतर काही वर्षे सर्वकाही सुरळीत होते, पण नंतर येथे विचित्र घटना घडू लागल्याचे सांगण्यात येते. 1967 मध्ये बेगुनकोदरच्या एका रेल्वे कर्मचाऱ्याने स्टेशनवर एका महिलेचे भूत पाहिल्याचा दावा केला होता. त्याच स्टेशनवर रेल्वे अपघातात त्या मुलीचा मृत्यू झाल्याची अफवाही पसरली होती. दुसऱ्या दिवशी त्या रेल्वे कर्मचाऱ्याने लोकांना याबाबत सांगितले. खरंच सफेद कपड्यात फिरतात का भूत? अनेक वेळा भूतांना पाहिलेल्या महिलेचा धक्कादायक दावा लोक म्हणतात की त्यांनी या रेल्वे स्टेशनच्या रुळांवरून एक मुलगी पाहिली आहे, जी नेहमी पांढरे कपडे घालते.
advertisement
या स्टेशनचे अनेक किस्से आहेत. याला झपाटलेले स्टेशन म्हणून ओळखले जाऊ लागले. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, ज्यावेळी स्टेशन उघडले तेव्हा स्टेशन मास्टरला ट्रॅकवर एक अनोळखी महिला दिसली. या ठिकाणाशी संबंधित भुताटकीच्या कथांवर आजही लोकांचा विश्वास असल्याचे सांगितले जाते. स्थानिक लोक आणि आजूबाजूच्या गावांनी संध्याकाळी 5:30 वाजल्यानंतर इथे थांबू नये असा सल्ला देतात. या स्टेशनच्या आजूबाजूला भाताची शेते आहेत. परंतू दूरवर माणसांचे नाव नाही. ज्यामुळे हा स्टेशन पाहणे हा एक भयावह अनुभव आहे.










