शेकडो वर्षे बंद होता बोगदा; घाबरत घाबरतच आत घुसली व्यक्ती, बाहेर येताच पालटलं नशीब
- Published by:Priya Lad
Last Updated:
पृथ्वीच्या गर्भात अनेक रहस्यमय गोष्टी दडलेल्या आहेत.ज्यावेळी माणूस त्या गोष्टींपर्यंत पोहोचतो तेव्हा आश्चर्यकारक खुलासे होतात. असाच काहीसा प्रकार घडला आहे.
advertisement
तपास केला असता असं आढळून आलं की 1853 मध्ये सिसिलीचा तत्कालीन राजा बोर्बन के फर्डिनांड द्वितीयनं हे बांधलं होतं. जे आज गॅलेरिया बोर्बोनिका म्हणून ओळखलं जातं. 1816 पासून बोर्बन राजवटीविरुद्ध तीन क्रांती झाल्या. 1848 मध्ये जेव्हा क्रांतिकारकांनी 16 महिने राज्य काबीज केलं, तेव्हा अतिशय हिंसक क्रांती झाली. बोर्बन्स इतका घाबरला होता की त्यानं जमिनीखाली 150 मीटर खोलावर हा बोगदा बांधला. जेणेकरून शत्रूने हल्ला केला तर ते त्यातून पळून जाऊ शकतील.
advertisement
1849 मध्ये सत्तेवर परतल्यानंतर, फर्डिनांडने घाईघाईने नवीन संविधान लिहिलं आणि पुन्हा विद्रोह होण्याची स्थिती दिसताच पळून जाण्याची योजना तयार केली. त्यावेळी रॉयल पॅलेसमधून बाहेर पडण्यासाठी बोगद्याची कल्पना मांडण्यात आली होती. हा बोगदा रॉयल पॅलेसला त्या लष्करी बॅरेकला जोडतो, जो आता मोरेली मार्गे आहे.
advertisement
1930 च्या दशकात, या बोगद्यांचा वापर जप्त केलेली वाहनं ठेवण्यासाठी केला जाऊ लागला आणि नंतर तो कुणाच्याच लक्षात राहिला नाही. दुसर्या महायुद्धादरम्यान ते सुरक्षित बॅरेक म्हणून वापरलं गेलं. हवाई हल्ल्यांपासून वाचण्यासाठी लोक इथं लपून बसायचे. पण 2012 मध्ये जेव्हा हा बोगदा समोर आला तेव्हा दुसऱ्या महायुद्धातून वाचलेल्या आणि या बोगद्यात राहणाऱ्या टोनिनो पर्सिकोने भूगर्भशास्त्रज्ञ जियानलुका मिनिनशी संपर्क साधला.
advertisement
advertisement
advertisement
इटलीतील सर्वात जुनं शहर मॅपल्समध्ये हा बोगदा होता. डिसेंबर 2015 मध्ये त्याचं भव्य संग्रहालयात रूपांतर झालं. (Photo_www.galleriaborbonica.com)