Pune Navale Bridge Accident : नवले पुलावर असं काय आहे? इथं होतात सगळ्यात जास्त अपघात; म्हणतात ब्लॅक स्पॉट

Last Updated:
Pune Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पूल पुन्हा एकदा अपघातामुळे चर्चेत आला आहे. हा पूल अपघातासाठीच प्रसिद्ध आहे. इथं इतके अपघात होतात की याला ब्लॅक स्पॉट घोषित करण्यात आलं आहे.
1/5
महाराष्ट्रातील एक अत्यंत अपघातप्रवण ब्रीज म्हणजे पुणे जिल्ह्यातील नवले ब्रीज. हा ब्रीज मुंबई-बंगळुरू महामार्गावर नार्हे भागातील कात्रज देहू बायपासवर आहे. इथं ट्रक आणि मोठ्या वाहनांची संख्या खूप जास्त आहे.

advertisement
2/5
रिपोर्टनुसार 2021 मध्ये इथं सुमारे 30 अपघात झाले होते ज्यात 17 लोकांचा मृत्यू झाला. 2022 मध्ये 9 अपघात ज्यात 5 मृत्यू, 2023 साली 25 अपघात ज्यात 9 मृत्यू तर 2024 साली 18 अपघात ज्यात 7 मृत्यू झाले होते.

3/5
रिपोर्टनुसार अपघातांची कारणं एक ना दोन बरीच आहेत. पुण्यातील वाहतूक शाखेनेही या भागातील दुर्घटनांचं विश्लेषण केलं असून त्यामध्ये मुख्यत्वे ब्रेक फेल होणं, उताराचा वेग, जड वाहनांचे नियंत्रण सुटणं ही कारणं पुढे आली आहेत.

4/5
ब्रीजच्या आवारात 4.3 % उतार आहे. तीव्र उतारावर उतरताना अवजड वाहनं नियंत्रण गमावतात. अवजड वाहनांना अचानक ब्रेक लागणं कठीण होतं. अनेक वेळा ट्रक चालक इंधन वाचवण्यासाठी इंजिन बंद करून किंवा न्यूट्रलमध्ये ठेवून उतरत असल्यामुळे वाहनांवरील ताबा सुटतो.

5/5
समस्या केवळ ब्रीजची नसून त्याच्या आधीचा उतार, वाहनांची तीव्र गती, ब्रेकची देखभाल न होणं, आणि प्रवास करणाऱ्या व्यक्तींचं भान कमी असल्याचं आढळलं आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement