Maharashtra Result 2024: जरांगेंच्या जालन्यात मविआचा सुपडा साफ, पाचही जागा महायुतीच्या पारड्यात कशा?

Last Updated:

Maharashtra Assembly Election Result 2024: मराठवाड्यातील मराठा आरक्षणाच्या केंद्रबिंदू असलेल्या जालना जिल्ह्यात महायुतीच्या पाचही जागा आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे जरांगे फॅक्टर निष्प्रभ ठरल्याचे चित्र आहे.

+
Maharashtra

Maharashtra Election Result 2024: जरांगेंच्या जालन्यात मविआचा सुपडा साफ, पाचही जागा महायुतीच्या पारड्यात कशा?

नारायण काळे, प्रतिनिधी, जालना : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज मतमोजणी होत आहे. मतमोजणीच्या कलांमध्ये महायुतीने मोठी आघाडी घेतली असून प्रचंड विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मराठवाड्यातील मराठा आरक्षणाच्या केंद्रबिंदू असलेल्या जालना जिल्ह्यात महायुतीच्या पाचही जागा आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे जरांगे फॅक्टर निष्प्रभ ठरल्याचे चित्र आहे. निवडणुकीआधी जरांगे फॅक्टरचा बोलबाला मराठवाड्यात राहील असं विश्लेषकांचे मत होतं. मात्र लाडकी बहीण योजना आणि सरकारने शेतकऱ्यांसाठी निवडणुकीच्या तोंडावर राबवलेल्या योजनांनी जरांगे फॅक्टर वर मात केल्याचं पाहायला मिळतेय. जालना जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे फॅक्टर निष्प्रभ ठरण्याची काय कारणे आहेत? हे आम्ही ज्येष्ठ पत्रकार सुरेश कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेतलं पाहुयात.
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचे सहा ते सात टप्पे झालेत. त्यांचे आंदोलन तिसऱ्या टप्प्यापर्यंत अतिशय सुरळीत होते. अगदी संभाजी भिडे, राज ठाकरे, बाळासाहेब आंबेडकर इत्यादी नेत्यांचाही त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा होता. मात्र जसजसं आंदोलन पुढे गेलं जरांगे पाटील आपल्या भूमिका बदलत गेले. ही गोष्ट मराठा समाजातील अनेकांना आवडली नाही. याचा कळस त्यावेळी झाला जेव्हा जरांगे पाटलांनी सांगितलं आपलं भांडण केंद्र सरकारशी नाही तर राज्य सरकारशी आहे. त्यामुळे विधानसभेच्या वेळेस आपण पाहुयात. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला.
advertisement
संपूर्ण 288 जागा लढवण्याची त्यांनी तयारी केली. उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. अगदी शेवटी मतदारसंघ देखील जाहीर केले. अचानक रात्रीतून त्यांनी जो यू टर्न घेतला त्याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळालं. ज्यांना मराठा आरक्षण आंदोलनातून निवडणूक लढवायची होती ते कार्यकर्ते नाराज झाले. हे नाराज झालेले कार्यकर्ते जरांगे पाटील यांच्या विरोधात गेली नाहीत मात्र हे कार्यकर्ते पुन्हा एकदा आपल्या आपल्या पक्षात सक्रिय झाले.
advertisement
दुसरा मुद्दा म्हणजे मनोज जरांगे यांनी कोणत्याही पक्षाला पाठिंबा किंवा कोणतीही राजकीय भूमिका घेतली नाही. याचा देखील सकारात्मक परिणाम मतदारांवर झाला. मनोज जरांगे यांचा आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून गेलेल्या राजकीय संदेश यावेळी लोकांनी स्पष्टपणे नाकारला असा या निकालाचा अर्थ होतो, असं सुरेश केसापूरकर यांनी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/Politics/
Maharashtra Result 2024: जरांगेंच्या जालन्यात मविआचा सुपडा साफ, पाचही जागा महायुतीच्या पारड्यात कशा?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement