ठाकरे जिंकले! वरळीत पुन्हा आदित्य पर्व, कार्यकर्त्यांनी सांगितला विजयाचा फॅक्टर

Last Updated:

Aditya Thackeray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून वरळीतून पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी बाजी मारलीये.

+
ठाकरे

ठाकरे जिंकले! वरळीत पुन्हा आदित्य पर्व, कार्यकर्त्यांनी सांगितला विजयाचा फॅक्टर

निकिता तिवारी, प्रतिनिधी
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असून महायुतीला घवघवती यश मिळत आहे. तर महायुतीला मोठा फटका बसला आहे. मात्र, मुंबईतील वरळी विधानसभा मतदार संघातून पुन्हा एकदा आदित्य ठाकरे विजयी झाले आहेत. तिरंगी लढतीत त्यांनी मिलिंद देवरा आणि संदीप देशपांडे यांचा पराभव केला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. तसेच यशाचं गुपित देखील लोकल18 सोबत बोलताना सांगितलंय.
advertisement
सचिन भोईर यांचा बालेकिल्ला असलेला वरळी मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसच्या मतदारांनी भरलेला असायचा. मात्र सचिन भोईर यांनी पक्ष बदलल्यानंतर येथील मतदार वर्ग संभ्रमात पडला आणि मतदार वर्ग फुटण्यास सुरुवात झाली. 2019 च्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी या मतदारसंघातून पहिली विधानसभा निवडणूक लढवली आणि ती जिंकली सुद्धा. ही निवडणूक जिंकल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी वरळीतील अनेक विभागांचा विकास केला आणि लोकांची मते आणि मने दोन्ही जिंकली, त्यामुळेच त्यांना या निवडणुकीत पुन्हा बाजी मारल्याचे शिवसैनिकांनी सांगितले.
advertisement
वरळी विधानसभेतआदित्य ठाकरे, संदीप देशपांडे आणि मिलिंद देवरा यांच्यामध्ये तिरंगी लढत होती. मात्र यात आदित्य ठाकरे यांनी बाजी मारली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे 2014 मध्ये सुद्धा शिवसेनेने इथे आपला मतदार वर्ग निर्माण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 2019 ची निवडणूक आदित्य ठाकरे जिंकले. पण यंदाची निवडणूक ठाकरे यांच्यासाठी थोडी महत्त्वपूर्ण आणि तितकीच कसोटीची होती. कारण मनसे आणि भाजपचे दोन दिग्गज नेते आदित्य यांच्याविरुद्ध वरळी विधानसभेतून लढत होते.
advertisement
बिडीडी चाळीचा पुनर्विकास आणि कोस्टल रोड मुळे मच्छीमारांचा विरोध हे दोन मुख्य प्रश्न या मतदारसंघात होते. त्याशिवाय मुंबईतील अनेक समस्या इथे देखील आहेत. आदित्य ठाकरे यांच्या आधी शिवसेनेचे सुनील शिंदे त्या ठिकाणी विद्यमान आमदार होते. शिंदे हे कट्टर शिवसैनिक असून नगरसेवक पदापासून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. आदित्य ठाकरे यांच्या 2019 च्या प्रचारात देखील ते आदित्य ठाकरेंसोबत सहभागी होते. आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा जनतेचा विश्वास मिळवला आणि भरघोस मतांनी विजयी झाले. गेल्या पाच वर्षांमध्ये आदित्य ठाकरे यांनी वरळीमधील रस्ते आणि वेगवेगळ्या गोष्टींवर काम केल्यामुळे जनतेचा विश्वास मिळवण्यात ते पूर्णपणे यशस्वी झाले, असंही ठाकरेंच्या शिवसैनिकांनी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/Politics/
ठाकरे जिंकले! वरळीत पुन्हा आदित्य पर्व, कार्यकर्त्यांनी सांगितला विजयाचा फॅक्टर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement