Pune Gym: व्यायाम केला,पाणी प्यायले आणि मृत्यूने गाठलं, जिममध्ये 37 वर्षीय तरुणाचा मृत्यूचा LIVE VIDEO

Last Updated:

जिममध्ये व्यायाम करताना पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये एका ३७ वर्षी तरुणाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

News18
News18
 पिंपरी : आरोग्याची काळजी घेत अनेक जण फीट राहण्यासाठी किंवा आपलीही चांगली शरीरयष्टी असावी यासाठी जिम लावत असतात. पण जिममध्ये व्यायाम करताना पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये एका ३७ वर्षी तरुणाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मृत्यूची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,  पिंपरी- चिंचवडमधील एका जिममध्ये शुक्रवारी सकाळी ९.२८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.  मिलिंद कुलकर्णी (वय ३७) असं मृत तरुणाचं नाव आहे. मिलिंद कुलकर्णी यांचा ह्रदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
मिलिंद कुलकर्णी यांनी  सहा महिन्यांपूर्वी  चिंचवड गावामध्ये जिम जॉईंन केली होती. मिलिंद कुलकर्णी हे अधून-मधून ते जिमला जात होते. आज शुक्रवारी सकाळी ते नेहमी प्रमाणे जिमध्ये आले. आल्यानंतर  थोडा व्यायाम केला. त्यानंतर थोडा ब्रेक घेऊन ते बाजूला बसले. पाणी प्यायलानंतर काही सेंकदात त्यांना अचानक भोवळ आली आणि ते खाली कोसळले. हा सगळा प्रकार जिममध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
advertisement
अचानक मिलिंद कुलकर्णी खाली कोसळल्याचं पाहून जिममध्ये व्यायाम करणारे इतर सहकारी धावून आले. त्यांनी  मिलिंद कुलकर्णी यांना तातडीने नजिकच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं.  मिलिंद कुलकर्णी यांचा मृत्यू हृदविकाराच्या झटक्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, मिलिंद कुलकर्णी यांच्या पत्नी डॉक्टर आहेत. मिलिंद कुलकर्णी यांच्या मृत्यूमुळे कुलकर्णी कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Gym: व्यायाम केला,पाणी प्यायले आणि मृत्यूने गाठलं, जिममध्ये 37 वर्षीय तरुणाचा मृत्यूचा LIVE VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement