Pune News: श्रावणात एसटीची खास सेवा, लालपरीने करता येणार देवदर्शन, पाहा यात्रा बसचे वेळापत्रक
- Reported by:Niranjan Sherkar
- local18
- Published by:
Last Updated:
ST Bus: पवित्र श्रावण महिन्यात अनेक भाविक विविध ठिकाणी मोठ्या संख्येने देवदर्शनाला जात असतात. एस टी महामंडळाच्या पुणे विभागाकडून श्रावण महिन्यात देवदर्शनाला जाण्यासाठी विशेष यात्रा बससेवेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील शक्तिपीठांसह, अष्टविनायकाचे दर्शन भाविकांना करता येणार आहे.
पुणे: सध्या श्रावण महिना सुरू असून या महिन्याला फार धार्मिक महत्त्व आहे. या महिन्यात देवदर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाकडून विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे. पुणे विभागाने महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठं, अष्टविनायक यात्रा आणि विविध तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे.
श्रावण महिना सुरू होताच देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळते. देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा यासाठी एस टी महामंडळाकडून यावर्षीही 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान विशेष दर्शन यात्रेचे आयोजन केले गेले आहे. यात महिलांना प्रवास भाड्यात 50 टक्के सूट असणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना ही सवलतीच्या दरात प्रवास करता येईल. विशेष म्हणजे प्रवासादरम्यान चहा, नाश्ता, जेवण आणि निवासाची देखील व्यवस्था असणार आहे.
advertisement
एस टी महामंडळाच्या विशेष सुविधेमुळे भाविकांना गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर, कोल्हापूर, श्रीक्षेत्र देहू-अळंदी, अंबाजोगाई, नसराबाईची (नरसोबाची) वाडी, गोळवडले, शिरवळ, शिंगणापूर, खिद्रापूर आदी देवस्थानांना जाता येणार आहे.
यात्रेसाठी निम आराम आणि साधी बस
सर्व विशेष गाड्या स्वारगेट आगारातून सोडण्यात येणार असून, प्रवाशांसाठी आरक्षणाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. यामध्ये नीम आराम आणि साध्या बसची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांना सुरक्षित प्रवास अनुभवता यावा यासाठी गाड्यांमध्ये विशेष खबरदारी घेतली जाणार आहे.
advertisement
यात्रा विशेष बस गाड्यांचे वेळापत्रक
अष्टविनायक दर्शन: 13 व 16 ऑगस्ट
गोंदवले, शिरवळ, शिखर शिंगणापूर: 15 ऑगस्ट
आदामपूर, खिद्रापूर, नरसोबाची वाडी: 16 व 17 ऑगस्ट
गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर: 9 व 17 ऑगस्ट
गणपतीपुळे, देवळा, पावन मंदिर: 18 ते 20 ऑगस्ट
तुळजापूर, महूरगड, रेणुका माता (साडेतीन शक्तीपीठे): 18 ते 21 ऑगस्ट
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Aug 01, 2025 12:11 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: श्रावणात एसटीची खास सेवा, लालपरीने करता येणार देवदर्शन, पाहा यात्रा बसचे वेळापत्रक







