Shirur Lok Sabha : 'कोल्हेंसाठी जीवाचं रान केलं, पण त्यांनी चहापण पाजला नाही'; राष्ट्रवादीच्या आमदाराची खदखद बाहेर

Last Updated:

Shirur Lok Sabha : अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली आहे.

राष्ट्रवादीच्या आमदाराची खदखद बाहेर
राष्ट्रवादीच्या आमदाराची खदखद बाहेर
पुणे, (रायचंद शिंदे, प्रतिनिधी) : शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला आहे. खेड तालुक्यात प्रचाराची धुरा सांभाळणारे अजित पवार गटाचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी डॉ. अमोल कोल्हेंवर निशाणा साधला. मागच्या वेळी डॉ अमोल कोल्हेंसाठी जिवाचं रान केलं. त्यांना निवडुनही आणलं. पण मला त्यांनी चहा सुद्धा पाजला नाही, अशा शब्दात टोमणा मारला आहे.
आमदार दिलीप मोहितेंची कोल्हेंवर टीका
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रचार सुरू आहे. या प्रचाराचं नेतृत्व करणारे आमदार दिलीप मोहिते यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. खासदाराने संसदेत प्रश्न मांडण्यापेक्षा जनतेच्या दैनंदिन अडचणी समजून घ्यायला हव्यात असं म्हणत मोहिते पाटलांनी कोल्हेंच्या संसदेतील भाषणावर सुद्धा टिपण्णी केली. लोकांनी आम्हाला आमदार खासदार केलं. त्यामुळे संसदेत आणि विधानसभेत प्रश्न मांडले तर आम्ही उपकार करत नाही. तुम्ही संसदेत प्रश्न मांडले, मी विधानसभेत मांडले, लोकांनी प्रश्न मांडण्यासाठी निवडून दिलंय. त्यामुळे आपण उपकार करत नाही. अशा शब्दात मोहिते पाटीलांनी कोल्हेंना जबाबदारीची जाणीव करुन दिलीय.
advertisement
महायुतीला धक्का
शिरूर लोकसभा मतदार संघात ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाचे नेते अतुल देशमुख यांनी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि भाजपच्या ध्येय धोरणांवर नाराजी व्यक्त करत भाजपला रामराम ठोकलाय. शिरूर लोकसभा निवडणुकीत खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करणं म्हणजे यश मिळाले तर माझे आणि अपयश आलं कि अतुल देशमुख यांचे अशी भुमिका असल्याने भाजपाकडुन लोकसभा निवडणुकीचा समन्वय झाला नाही.त्यातच दिलीप मोहिते पाटील यांच्याशी असलेल्या संघर्षामध्ये काम करणं शक्य नाही..म्हणुन आज राजीनामा दिलाय. पुढच्या काळात आम्हाला न्यायिक मार्ग मिळेल त्या पक्षांतर प्रवेश करु अशी माहिती अतुल देशमुख यांनी माद्यमांशी बोलताना व्यक्त केलीय.
मराठी बातम्या/पुणे/
Shirur Lok Sabha : 'कोल्हेंसाठी जीवाचं रान केलं, पण त्यांनी चहापण पाजला नाही'; राष्ट्रवादीच्या आमदाराची खदखद बाहेर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement