Ajit Pawar : पिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीचा अपघात, अजितदादा ताफा थांबवून मदतीला धावले! पाहा Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Ajit Pawar run to Help video : अरे बाबा तुला लागलं नाय ना... तुला गाडी चालवता येईल का? की कुणाल सोडायला सांगू, असं म्हणत अजित पवार यांनी त्याची विचारपूस केली.
Ajit Pawar Viral Video : उपमुख्यमंत्री अजित पवार आज देखील पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी सकाळी अजित पवारांच्या जिजाई या निवास स्थानापासून पिंपरी चिंचवडच्या दिशेने जात असताना रेंज हिल परिसरात एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला होता. त्यावेळी अजित पवारांनी ताफा थांबवला अन् दादा अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले. ताफा थांबवत अपघातग्रस्तांची विचारपूस केली आणि आपल्या ताफ्यातील ॲम्बुलन्समध्ये त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं.
अरे बाबा तुला लागलं नाय ना... तुला गाडी चालवता येईल का? की कुणाल सोडायला सांगू, असं म्हणत अजित पवार यांनी त्याची विचारपूस केली. गाडी घेऊन हळू जा.. घाबरू नको, असं म्हणत अजित पवारांनी त्याला धीर दिला. त्यावेळी काही वेळ ट्रॅफिक देखील जाम झाल्याचं दिसलं. अजितदादांना पाहून अनेकांनी आपल्या गाड्या वळवल्या. त्यामुळे दादांनी तिथून लवकर जाणं पसंत केलं.
advertisement
पाहा Video
पिंपरी चिंचवडमध्ये रेंज हिल परिसरात एका दुचाकीस्वाराचा अपघात, अजितदादा ताफा थांबवून मदतीला धावले! pic.twitter.com/0ZV5ynUalQ
— News18Lokmat (@News18lokmat) January 8, 2026
अजित पवार पुन्हा आपला बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी आक्रमक प्रचार करण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये उतरले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या 9 वर्षांतील भाजपाच्या सत्ताकाळात झालेल्या भ्रष्टाचारावरून सातत्याने आरोप करीत आहे. गुंडगिरी, दादागिरी व दहशत माजवून महापालिका अक्षरश: लुटून खाल्ल्याचा तोफ त्यांनी भाजपाचे आमदार महेश लांडगे यांचे नाव न घेता डागली होती.
advertisement
दरम्यान, अजित पवार यांच्यावर महेश लांडगेंनी हल्लाबोल केला. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. ‘पिंपरी-चिंचवडमधील भ्रष्टाचाराच्या ‘आका’ला संपवायचे आहे,’ असे विधान पवारांनी केल्यानंतर, बुधवारी आमदार लांडगे यांनी प्रत्युत्तर देत अजित पवार हेच राज्यातील भ्रष्टाचाराचे ‘आका’ असल्याचा आरोप केला आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 11:47 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Ajit Pawar : पिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीचा अपघात, अजितदादा ताफा थांबवून मदतीला धावले! पाहा Video









