'साहेब दादांना सीएमपदासाठी आशिर्वाद द्या'; बारामतीत पवारांनीच लावलं बॅनर
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
बारामतीमध्ये लावण्यात आलेल्या एका बॅनरमुळे पुन्हा एकदा अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबतच्या चर्चेला उधाण आलं आहे.
पुणे, 13 नोव्हेंबर, जितेंद्र जाधव : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेला उधाण आलं आहे. त्याला कारण म्हणजे बारामतीमध्ये लावण्यात आलेलं एक बॅनर आहे. अनिकेत पवार मित्र परिवाराच्या वतीनं हे बॅनर लावण्यात आलं आहे. या बॅनरवर अजित पवार यांच्या फोटोसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, पार्थ पवार, जय पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो आहेत.
'आदरणीय साहेब, दादांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांच्या पाठीशी आपण ठाम पणे उभे रहाल हा समस्त बारामतीकरांचा विश्वास नाही तर खात्री आहे. ' असा मजकूर या बॅनरवर छापण्यात आला आहे. अनिकेत पवार मित्र परिवाराकडून हे पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टरमुळे पुन्हा एकदा अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेला उधाण आलं आहे.

advertisement
दरम्यान पवार कुटुंबीय बारामतीत दिवाळीसाठी एकत्र आलेलं पाहायला मिळालं. शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील शारदोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथील गदिमा सभागृहात संगीत गाण्यांचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच मंचावर आले. यावेळी बहीण भावांचं बाँडींगही पाहायला मिळालं. दिवाळीत लोकांच्या गाठीभेटी घेणार नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं होतं. परंतु, बारामतीतील शारदोत्सवाला अजित पवारांनी हजेरी लावली. मास्क घालून अजित पवार कार्यक्रमात बसले होते.
advertisement
यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, आमची लढाई ही वैचारिक आहे. व्यक्तीगत नाही. आमच्यामध्ये राजकीय मतभेत आहेत, मात्र व्यक्तीगत लढाई नाही. भाजपमधील अनेक नेत्यांशीही आमचे चांगले संबंध आहेत, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
view commentsLocation :
Pune,Pune,Maharashtra
First Published :
November 13, 2023 3:14 PM IST


