advertisement

भाऊ म्हणतो अपहरण पण बहीण म्हणते प्रेम; भिगवणची तरुणी आली समोर; 24 तासात काय काय घडलं? वाचा A to Z माहिती

Last Updated:

तरुणीच्या व्हिडीओनंतर कुटुंबीयांनी दाखल केलेल्या अपहरणाच्या तक्रारीवर गंभीर संशय निर्माण झाला आहे.

Bhigwan Update
Bhigwan Update
पुणे : इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात एका मुलीचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली होती. लग्नाची खरेदी करण्यासाठी आपल्या आई आणि भावासोबत गेलेल्या तरूणीचं अपहरण करण्यात आल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे, तरूणीच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात तिखट टाकून दोन तरूणांनी तरुणीचं अपहरण केल्याचं सांगण्यात आलं. मात्र, याप्रकरणाला वेगळंच वळण मिळालं असून मुलीने स्वत: व्हिडिओ बनवून याबाबत माहिती दिली. माझे संबंधित मुलासोबत प्रेमसंबध आहेत, मी माझ्या मर्जीने त्याच्यासोबत आल्याचं मुलीने व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्याने या घटनेत ट्विस्ट पाहायला मिळाला.
भिगवणच्या तरूणीने एक व्हिडीओ करून माझे अपहरण झाले नसल्याची माहिती दिली आहे. ज्या तरूणावर माझ्या अपहरणाचा आरोप होतोय त्याच्यासोबत माझे प्रेमसंबध असल्याची कबुली मुलीने कॅमेऱ्यासमोर येत दिली आहे. माझ्या अपहरणाच्या बातम्या खोट्या असल्याचं देखील मुलीने स्पष्ट केले आहे. अपहरणानंतर २४ तास भिगवण पेटलं होते. भिगवणमध्ये मोठ्या प्रमाणावर तणावपूर्ण स्थिती पाहायला मिळाली.
advertisement

अपहरणाच्या तक्रारीवर गंभीर संशय

भिगवण येथील तरुणीने सोशल मीडियावर व्हिडीओ जारी करत माझे अपहरण झालेले नसल्याचे स्पष्ट केल्याने संपूर्ण प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. या खुलाशानंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या अपहरणाच्या तक्रारीवर गंभीर संशय निर्माण झाला असून, पोलिस तपासाची दिशा बदलण्याची शक्यता आहे. सत्य काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
advertisement

भिगवणमध्ये  २४ तासात काय काय घडलं?

  • रात्री ९ वाजता : दौंड तालुक्याच्या स्वामी चिंचोली मधील 21 वर्षीय तरुणीला भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अपहरण झाल्याचे समोर आले. दोन मुस्लिम तरुणांनी दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात लाल तिखट फेकून अपहरण करत पळ काढल्याची तक्रार पोलीस स्थानकात करण्यात आली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली
  • रात्री ९.३० वाजता - संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली. ​तपासकामी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली. टोल नाके आणि मुख्य रस्त्यांवर बारीक लक्ष ठेवले जात होते. भिगवण पोलीस स्टेशन समोर गर्दी जमण्यास सुरुवात
  • रात्री १०. ३० वाजता: भिगवण पोलीस ठाण्यासमोर हिंदू संघटनांची घोषणाबाजी, हिंदू संघटना आक्रमक
  • रात्री १०.४५ वाजता - भिगवण मधील हिंदू संघटना आक्रमक झाल्या. पुणे सोलापूर महामार्ग अडवला, महामार्गावर टायर पेटवले. अपहरण केलेल्या दोन तरुणांना लवकरात लवकर अटक करण्याच्या मागणीसाठी पुणे सोलापूर महामार्ग अडवला, पुणे सोलापूर महामार्ग जाम
  • मध्यरात्री १.४० - पुणे ग्रामीण पोलिसांच्या 4 टीम मार्फत शोध सुरु.... CCTV पाहून पुढील तपासाला सुरुवात... मोबाईल बंद असल्याने वाहन घेऊन जात त्या मार्गावर CCTV पाहणे हा एकच पर्याय ... पुढील 24 तासांत आरोपीला ताब्यात घेऊ,कोणीही बेकायदेशीर कृत्य करू नये पुणे ग्रामीण अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांचे आवाहन
  • सकाळी ८ वाजता- संतप्त जमावाकडून भिगवन पोलीस ठाण्यात घोषणाबाजी करण्यात आली तसेच भिगवन मधून जाणाऱ्या पुणे सोलापूर महामार्गावर टायर जाळण्यात आले या घटनेनंतर पोलिसांनी जमावाला पांगवले
  • सकाळी ९.३६ - इंदापूर मध्ये गोपीचंद पडळकर यांच्या सभेची परवानगी पोलिसांनी नाकारली. भिगवण प्रकरणात गोपीचंद पडळकर यांची आज होणाऱ्या सभेला पुणे ग्रामीण पोलिसांनी नाकारली परवानगी.. तणाव निर्माण होऊ नये तसेच उद्या शिवजयंती असल्यामुळे पोलिसांनी सभेसाठी परवानगी नाकारली
  • सकाळी १०.३० - मुस्लिम समाजाकडून घटनेचा निषेध
  • सकाळी १०.४५ - भिगवन पोलीस स्टेशन मध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते प्रदीप गारटकर हे पोलिसांची चर्चा करण्यासाठी आले.
  • सकाळी ११ वाजता - पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांची पत्रकार परिषद
  • दुपारी १.३० वाजता - गोपीचंद पडळकरांनी केला निषेध
  • दुपारी ३.४५ - गोपीचंद पडळक येणार असल्याने भिगवण पोलीस स्थानकाबाहेर गर्दी
  • दुपारी ४.३०- हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन
  • दुपारी ४.५० - मोर्चासाठी पडळकरांची हजेरी
  • सायंकाळी ५ वाजता - मुलीचा व्हिडीओ समोर
  • सायंकाळी ५.३० वाजता - भिगवण पोलिस ठाण्यासमोर हिंदू कार्यकर्त्यांचा मोठा गोंधळ, पोलीस ठाण्यात जाण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी
advertisement
view comments
मराठी बातम्या/पुणे/
भाऊ म्हणतो अपहरण पण बहीण म्हणते प्रेम; भिगवणची तरुणी आली समोर; 24 तासात काय काय घडलं? वाचा A to Z माहिती
Next Article
advertisement
दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
  • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

  • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

  • 35,000 कोटींची बंपर खरेदी

View All
advertisement