Railway Ticket Booking : रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय! पोस्ट ऑफिसमधून काढा रेल्वे तिकीट, स्टेप बाय स्टेप प्रक्रिया जाणून घ्या
Last Updated:
Railway Ticket : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता आयआरसीटीसीचे तिकीट पोस्ट ऑफिसमधूनही बुक करता येईल. देशभरातील अनेक निवडक पोस्ट ऑफिसमध्ये ही सेवा सुरू झाली असून ग्रामीण प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
पिंपरी : रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ज्यानुसार आता प्रवाशांना आता आपल्या परिसरातील पोस्ट ऑफिसमधूनही रेल्वे प्रवासाचे तिकीट बुक करता येणार आहे. दिवाळीच्या काळात गावी जाण्यासाठी रेल्वे तिकिटांसाठी मोठी गर्दी असते. रेल्वेच्या काउंटरवर सहज तिकीट मिळवणे कठीण जाते. तसेच अनेकदा आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर तांत्रिक समस्या येतात आणि बुकिंग अडकते. अशावेळी प्रवाशांना मोठी अडचण होते. मात्र आता या सुविधेमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. चला तर जाणून घेऊयात पोस्ट ऑफिसमधून कशा प्रकारे तिकीट बुकिंग करता येईल.
या सुविधेचा लाभ कोणत्या भागातील नागरिकांना मिळणार?
ही सुविधा देशभरातील 333 निवडक पोस्ट ऑफिसमध्ये सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही सर्व पोस्ट ऑफिस ग्रामीण आणि निमशहरी भागातील आहेत, जिथे रेल्वे आरक्षण काउंटर उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांनाही आता रेल्वे तिकीट सहज मिळू शकणार आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पोस्ट ऑफिसमधील ही तिकीट बुकिंग सेवा 24 तास उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे दिवसभरात कधीही रेल्वे तिकीट बुक करता येईल.
advertisement
पोस्ट ऑफिसमधून रेल्वे तिकीट कसे बुक कराल?
तिकीट बुक करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. प्रवाशांनी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पीआरएस (Passenger Reservation System) काउंटरवर संपर्क साधायचा आहे. तिथे रेल्वे प्रवासाची माहिती सविस्तर द्याल. जसे की, स्थानकाचे नाव, प्रवासाची तारीख, ट्रेनचे नाव किंवा क्रमांक, आणि वर्ग (स्लीपर, एसी, जनरल) अशा पद्धतीने. त्यानंतर एक फॉर्म भरून तिकिटाचे पैसे जमा करायचे आहेत. पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी बुकिंग करून लगेच तिकीट देतील.
advertisement
रेल्वे आरक्षण काउंटरवर जशी सुविधा असते तशीच सेवा आता पोस्ट ऑफिसमध्ये मिळेल. त्यामुळे आता प्रवाशांना तिकिटासाठी लांब रांगा लावण्याची गरज नाही. ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि इंटरनेट वापरात अडचण येणाऱ्या लोकांसाठी ही सेवा फारच उपयुक्त ठरणार आहे. पोस्ट ऑफिसच्या या नव्या उपक्रमामुळे अधिक लोकांना रेल्वे प्रवास सोपा आणि सुलभ होणार आहे. ही सुविधा लागू झाल्याने देशभरातील हजारो प्रवाशांना मोठा फायदा होईल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 19, 2025 6:41 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Railway Ticket Booking : रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय! पोस्ट ऑफिसमधून काढा रेल्वे तिकीट, स्टेप बाय स्टेप प्रक्रिया जाणून घ्या