Gautami Patil Car Accident: 'गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?' चंद्रकांत पाटलांचा थेट पोलिसांना फोन

Last Updated:

भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे हे प्रकरण पोहोचलं. खुद्द चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांनी फोन करून कार ताब्यात घेण्याचे आदेश दिले. 

News18
News18
पुणे : नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कारचालकाने रिक्षाला धडक दिली होती. या प्रकरणी आता घडामोडींना वेग आला आहे. सिंहगड पोलिसांनी गौतमी पाटील हिला नोटीस बजावली आहे. तर दुसरीकडे, भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे हे प्रकरण पोहोचलं. रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी सगळी हकीकत चंद्रकांत पाटील यांच्याकडे मांडली. त्यानंतर खुद्द चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांनी फोन करून कार ताब्यात घेण्याचे आणि कारवाईचे आदेश दिले.
४ दिवसांपूर्वी पुण्यामध्ये गौतमी पाटीलच्या कारचालकाने रिक्षाचालकाला धडक दिली होती. या अपघातात रिक्षाचालक सामजी मरगळे जखमी झाले.  त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांच्या मुलीने भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. हे प्रकरण त्यांच्या कानी टाकण्यात आलं. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी थेट सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये फोन लावला. 'गौतमी पाटीलला उचलायचं की नाही, आहे पण ती गाडी कुणाची तरी आहे ना. मग हा रिक्षाचालक गंभीर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे, मग त्यांचा खर्च तिला घ्यायला सांगा. गाडी कुणी तरी चालवत होतं ना, भूत तर चालवतं नव्हतं. आता काय कारवाई करायची ते लगेच पाहा. गाडी जप्त करा' असे आदेशच पाटील यांनी पोलिसांना दिले.
advertisement
गौतमी पाटीलच्या टीमवर रिक्षाचालक कुटुंबीयांचा गंभीर आरोप
दरम्यान, रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे  यांच्या कुटुंबीयांनी गौतमी पाटीलवर गंभीर आरोप केले आहे.  अपघात झाल्यानंतर  घटनास्थळी पंचनामा न करत गौतमी पाटील हिची गाडी हलवण्यात आली होती. ही गाडी कुणी हलवली? आम्हाला संशय आहे की, पोलिसांनी ज्या ड्रायव्हरला अटक केली आहे, तो मुळ ड्रायव्हरच नाही. पोलीस स्टेशनला दुसराच ड्रायव्हर हजर करण्यात आला. एवढंच नाहीतर फिर्यादीही बदलण्यात आले आहे, असा आरोप मरगाळे कुटुंबीयांनी केला.
advertisement
तसंच, जेव्हा अपघात घडला तेव्हा गौतमी पाटील या कारमध्ये होत्या, त्यांना समोर आणलं पाहिजे. गाडी मालक या गौतमी पाटील आहे तर त्या समोर का येत नाही. पोलिसांना विचारलं तर पोलीस सांगतात की, गौतमीला नोटीस दिली आहे. पण प्रशासन कुणाच्या दबावाखाली काम करत आहे का? आम्ही सामन्य घरातले आहोत म्हणून तपास करायचा नाही का? तसं असेल तर पोलिसांनी सांगावं. मुळात अपघात झाल्यानंतर गौतमी पाटील यांच्या टीमकडून साधी विचारपूसही झाली नाही. गौतमी पाटील यांचं कार्यक्रम आजही सुरूच आहे. पण त्यांनी पुढं येऊन साधी विचारपूसही केली नाही. यामुळे त्या कुठे घाबरल्या आहेत का? या प्रकरणी आम्ही पोलीस आयुक्तांकडे जाणार आहोत, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणीही रिक्षाचालक मगराळे यांच्या मुलीने केली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Gautami Patil Car Accident: 'गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?' चंद्रकांत पाटलांचा थेट पोलिसांना फोन
Next Article
advertisement
अखेर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची घोषणा, पण..., शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट
अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट
  • अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट

  • अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट

  • अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट

View All
advertisement