पुण्यात हत्या; आरोपींना घरात ठेवलं, पळून जाण्यासही केली मदत, तरी महिलेला कसा मिळाला जामीन?
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
मुख्य आरोपींना आपल्या घरात आश्रय देणं. त्यांना कायदेशीर कारवाईतून वाचण्यासाठी पळून जाण्यास पैशांची मदत करणं, असे गंभीर आरोप लता रोकडे यांच्यावर ठेवण्यात आले होते
पुणे : पिस्तुलाने केलेल्या एका खून प्रकरणातील आरोपींना आश्रय दिल्याचा आणि पळून जाण्यास आर्थिक मदत केल्याचा आरोप असलेल्या महिलेला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. लता रतन रोकडे असं या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी न्यायालयाने तिला सशर्त जामीन मंजूर केला गेला आहे. चिखली पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या एका हत्या प्रकरणानंतर, मुख्य आरोपींना आपल्या घरात आश्रय देणं. त्यांना कायदेशीर कारवाईतून वाचण्यासाठी पळून जाण्यास पैशांची मदत करणं, असे गंभीर आरोप लता रोकडे यांच्यावर ठेवण्यात आले होते. या गुन्ह्यात सहभागी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्यांना अटक केली होती.
न्यायालयातील युक्तिवाद: या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात झाली. आरोपी महिलेच्या वतीने ॲड. सत्यव्रत जोशी यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्यांनी असा युक्तिवाद केला की, "संबंधित महिलेचा मूळ हत्येच्या कटाशी कोणताही थेट संबंध नाही. तसेच, अर्जदारावर हत्येचा कट रचल्याचा कोणताही आरोप ठेवण्यात आलेला नाही." याशिवाय, लता रोकडे यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
advertisement
दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर, न्यायाधीश शिवकुमार दिघे यांनी या महिलेची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसणे आणि हत्येच्या कटात सहभाग नसणे हे मुद्दे ग्राह्य धरले. परिणामी, न्यायालयाने आरोपी महिलेला सशर्त जामीन मंजूर केला. यामुळे पोलीस तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर आता तिची कारागृहातून सुटका होणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 15, 2026 11:52 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात हत्या; आरोपींना घरात ठेवलं, पळून जाण्यासही केली मदत, तरी महिलेला कसा मिळाला जामीन?









