Janani Suraksha Yojana : सुरक्षित प्रसूतीसाठी मिळतो आर्थिक लाभ, आवश्यक कागदपत्रे कोणती?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
या योजनेअंतर्गत महिलांना सुरक्षित प्रसूतीसाठी रुग्णालयात यायला प्रोत्साहन देण्यात येत आहे.
पुणे: माता मृत्यू आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडून जननी सुरक्षा योजना देशभर राबवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना सुरक्षित प्रसूतीसाठी रुग्णालयात यायला प्रोत्साहन देण्यात येत आहे. प्रसूतीनंतर शहरी भागातील महिलेला 600 रुपये, ग्रामीण भागातील महिलेला 700 रुपये, तसेच सिझेरियन प्रसूती झाल्यास 1500 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येत आहे.
लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात आर्थिक मदत
योजनेमुळे गरीब आणि अल्प उत्पन्न गटातील महिलांची प्रसूतीसाठी रुग्णालयात येण्याची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. केंद्र शासनाने 2005 मध्ये सुरू केलेली ही योजना, शहरी आणि ग्रामीण भागातील बीपीएल कार्ड असलेल्या गर्भवती महिलांना तसेच पहिली किंवा दुसरी प्रसूती करणाऱ्या महिलांना उपलब्ध आहे. शासकीय किंवा मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर रुग्णालयाकडून थेट लाभार्थीच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाते.
advertisement
लाभासाठी निकष आणि आवश्यक कागदपत्रे
बीपीएल कार्ड, शिधापत्रिका, आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र असलेल्या गर्भवती महिला आणि रुग्णालयात प्रसूती करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळतो.
या योजनेचा मुख्य उद्देश गरीब आणि अल्प उत्पन्न गटातील महिलांना घरच्या ऐवजी रुग्णालयात सुरक्षित प्रसूती करण्यास प्रोत्साहित करणे हा आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षभरात हजारो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 22, 2025 10:27 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Janani Suraksha Yojana : सुरक्षित प्रसूतीसाठी मिळतो आर्थिक लाभ, आवश्यक कागदपत्रे कोणती?