advertisement

दौंड: २१ वर्षीय तरुणीचं भरदिवसा अपहरण, संतापलेल्या हिंदू संघटनांनी सोलापूर हायवेवर टायर पेटवले

Last Updated:

स्वामी चिंचोलीतील २१ वर्षीय तरुणीचे जहीर शेख आणि अयान शेख यांनी अपहरण केले. भिगवण पोलीस स्टेशन, हिंदू संघटना, पुणे-सोलापूर महामार्ग, पोलिसांची नाकाबंदी.

News18
News18
दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील एका २१ वर्षीय तरुणीचे भररस्त्यात अपहरण केल्याची खळबळजनक घटना भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. जहीर शेख आणि अयान शेख या दोन नराधमांनी हे कृत्य केल्याचं समोर आलं असून, या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
डोळ्यात तिखट फेकलं अन् तरुणीला ओढून नेलं!
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आपल्या आई आणि भावासोबत दुचाकीवरून जात होती. यावेळी जहीर शेख आणि अयान शेख यांनी त्यांची दुचाकी अडवली. काही कळण्याच्या आतच आरोपींनी आई आणि भावाच्या डोळ्यात लाल तिखट फेकले. डोळ्यांची प्रचंड आग होऊ लागल्याने त्यांना काहीही दिसणं अशक्य झालं. याच संधीचा फायदा घेत आरोपींनी तरुणीला जबरदस्तीने सोबत घेतले आणि तिथून पळ काढला.
advertisement
पुणे-सोलापूर हायवेवर टायर पेटवले; हिंदू संघटना आक्रमक
या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच हिंदू संघटनांचे कार्यकर्ते भिगवण पोलीस स्टेशनसमोर मोठ्या संख्येने गोळा झाले. आरोपींवर कायद्याचा धाक उरला नाही, अशी भावना व्यक्त करत कार्यकर्त्यांनी पुणे-सोलापूर महामार्ग रोखून धरला. संतप्त आंदोलकांनी महामार्गावर टायर पेटवून जोरदार घोषणाबाजी केली, ज्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता.
संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी; पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आहेत. संपूर्ण पुणे जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली असून टोल नाके आणि मुख्य रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या टीम तयार केल्या असून लवकरच त्यांना बेड्या ठोकल्या जातील, असं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलं आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
दौंड: २१ वर्षीय तरुणीचं भरदिवसा अपहरण, संतापलेल्या हिंदू संघटनांनी सोलापूर हायवेवर टायर पेटवले
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement