पुण्याहून दिल्ली अन् उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने वाचणार, कसं ते पाहा
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
सध्या दौंड कॉर्ड लाईनवर केवळ एकच प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. यामुळे मनमाडकडून पुण्याकडे येणाऱ्या किंवा पुण्याकडून उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांना 'क्रॉसिंग'साठी ताटकळत उभे राहावे लागत होते.
trainपुणे : पुणे आणि दौंड दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दौंड कॉर्ड लाईनवरील दुसऱ्या प्लॅटफॉर्मचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे विशेषतः पुणे, मनमाड, दिल्ली आणि हावडा या मार्गांवर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
प्रवाशांना नेमका काय फायदा होणार?
सध्या दौंड कॉर्ड लाईनवर केवळ एकच प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. यामुळे मनमाडकडून पुण्याकडे येणाऱ्या किंवा पुण्याकडून उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांना 'क्रॉसिंग'साठी ताटकळत उभे राहावे लागत होते. आता दुसरा प्लॅटफॉर्म कार्यान्वित झाल्यामुळे गाड्यांना थांबावे लागणार नाही. परिणामी, प्रवासाचा वेळ किमान १५ ते २० मिनिटांनी कमी होणार आहे.
कॉर्ड लाईनचे महत्त्व: २०२० मध्ये सुरू झालेल्या या कॉर्ड लाईनमुळे गाड्यांना दौंड जंक्शनवर जाऊन इंजिन बदलण्याची कसरत करावी लागत नाही. मात्र, एकाच प्लॅटफॉर्ममुळे होणारी कोंडी ही मोठी अडचण होती. आता दौंड-काष्टी दरम्यानचे दुहेरीकरण पूर्ण होत असल्याने ही अडचण कायमची दूर होणार आहे.
advertisement
रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (CRS) येत्या १५ दिवसांत या मार्गाची आणि नवीन प्लॅटफॉर्मची पाहणी केली जाईल. मंजुरी मिळताच हा प्लॅटफॉर्म प्रवाशांसाठी खुला होईल. सुरुवातीला प्लॅटफॉर्म सुरू करून त्यानंतर छत आणि पादचारी पूल यांसारखी इतर कामे टप्प्याटप्प्याने केली जातील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 8:02 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्याहून दिल्ली अन् उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने वाचणार, कसं ते पाहा









