महाराष्ट्रात पहिल्यांदाच मासिक पाळीवर आधारित जिवंत देखावा, पुण्यातील संयुक्त मित्र मंडळाने केला सादर
- Published by:News18 Marathi
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
पुण्यातील सदाशिव पेठ येथे असलेल्या संयुक्त मित्र मंडळाने मासिक पाळीवर समाजप्रबोधन पर संगीतमय जिवंत देखावा सादर केला आहे. या देखाव्याची संकल्पना संयुक्त मित्र मंडळाचे सदस्य पियूष शहा यांची आहे.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : गणेश उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि गणेश उत्सवाला देखाव्यांची परंपरा आहे. हीच परंपरा पुढे नेत पुण्यातील वेगवेगळी मंडळ हे देखावे सादर करत असतात. पुण्यातील सदाशिव पेठ येथे असलेल्या संयुक्त मित्र मंडळाने मासिक पाळीवर समाजप्रबोधन पर संगीतमय जिवंत देखावा सादर केला आहे. या देखाव्याची संकल्पना संयुक्त मित्र मंडळाचे सदस्य पियूष शहा यांची आहे.
advertisement
पियूष शहा यांनी या देखाव्याबद्दल माहिती देताना सांगितले की, आपण बघतो की मासिक पाळीवर अजून देखील उघड पणे बोल जात नाही. आणि आता गणेश उत्सवाच स्वरूप बदल आहेत. त्यामुळे असा सामाजिक विषय घेऊन ते चार दिवस असा सुंदर देखावा तयार केला आहे. साडे पंधरा मिनिटचा हा पूर्ण देखावा आहे. यामध्ये 8 वर्षापासून ते 50 वर्षापर्यंत यामध्ये महिला मुली सहभागी आहेत.
advertisement
हिंदू - मुस्लिम ऐक्याची 77 वर्षांची परंपरा, जालन्यातील पहिला मानाचा गणपती
हा देखावा करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी लागला आहे. कमी शब्दामध्ये ही संकल्पना मांडली आहे. या मध्ये पोस्टर देखील पाहिला मिळतात. तर अतिशय सुंदर असा हा देखावा आणि पहिल्यांदाच महाराष्ट्रात मासिक पाळीवर आधारित हा जिवंत देखावा तयार केला आहे, अशी माहिती पियूष शहा यांनी दिली आहे.
advertisement
गणेशोत्सवाच्या निमित्ताने कारगिल युद्धाचा देखावा, पुण्यात कुठे पाहता येणार, हे आहे लोकेशन, VIDEO
हा देखावा बघण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होत आहे. यामुळे समाजात नक्कीच एक चांगला संदेश या माध्यमातून दिला जात आहे.
Location :
Pune (Poona) [Poona],Pune,Maharashtra
First Published :
September 12, 2024 9:23 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
महाराष्ट्रात पहिल्यांदाच मासिक पाळीवर आधारित जिवंत देखावा, पुण्यातील संयुक्त मित्र मंडळाने केला सादर