अध्यक्ष कोण यावर चर्चा सुरू पण उपमुख्यमंत्रिपदी कोण? फडणवीसांसोबत झाली चर्चा
- Published by:Prachi Amale
Last Updated:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावून अजित पवार यांचं खातं कोणाला द्यायचं याचा निर्णय होणार आहे.
प्रशांत लिला रामदास, प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनानं महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. त्यामुळं आता अजित पवारांच्या जाण्यानं त्यांच्या राष्टवादी पक्षाचं काय होणार? निधनापूर्वी अजित पवारांनी जी दोन्ही राष्ट्रवादीच्या जवळीकीची सुरुवात केलेली, त्यांचं काय होणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायेत.. त्यातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी नेत्यांनी केलेल्या दाव्यामुळे एकीकरणाच्या चर्चांना उधाण आलं. दरम्यान या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावून अजित पवार यांचं खातं कोणाला द्यायचं याचा निर्णय होणार आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री पदी कोण सांभाळणार या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी न्यूज १८ मराठीला दिली आहे.
advertisement
अजित पवारांच्या निधनानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरू झालीय. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा जोर धरू लागलीय. पण या चर्चा सुरू असतानाच अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. दरम्यान प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे या दोघांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांची चर्चा केली आहे. कार्यकर्त्यांची मागणी जर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री व्हावं अशी असेल तर त्यांच्याशी बोलून चर्चा करावी लागेल सध्या कोणाच्याही नावाची चर्चा नाही, अशी माहिती समोर आली आहे.
advertisement
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सध्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष हे प्रफुल पटेल आहेत. जो पर्यंत नवीन राष्ट्रीय अध्यक्ष होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कामकाज प्रफुल पटेल पाहणार आहेत. प्रथम अजित पवार यांच्या अकाली जाण्याने रिक्त झालेल्या जागेवर कोणाला उपमुख्यमंत्री पदी नियुक्त करायचे यांचा निर्णय होईल...
त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष आणि मर्जर संदर्भात चर्चा होईल. सध्या फक्त उपमुख्यमंत्री पदी कोण सांभाळणार या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
advertisement
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ही मतं जाणून घेतलं आणि अजित पवार यांच्या नंतर राज्यात पक्षाचं उपमुख्यमंत्री पद कोणाला दिलं जावं या संदर्भात चर्चा केली विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावून निर्णय घेतला जाईल असं ठरलं असल्याची विश्वसनीय नेत्यांची माहिती
राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
advertisement
दोन्ह राष्ट्रवादी एकत्र येत असताना शरद पवारांची राष्ट्रवादी सुनेत्रा पवारांना सामावून घेणार का हा मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय. तसंच प्रफुल्ल पटेल, तटकरे, पार्थ पवार यांना सुप्रिया सुळेंचं नेतृत्व मान्य होईल का हा सुद्धा मोठा प्रश्न असणार आहे. त्यातच शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात असलेल्या जयंत पाटील, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे यांना महत्त्वाची पदं मिळणार का याची सुद्धा जोरदार चर्चा आहे. त्यामुळं दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांचं मनोमीलन होईल का याबाबतही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 4:22 PM IST








