advertisement

ST Bus: मद्यपी चालकांना बसणार लगाम, आता नव्या बसमध्ये ‘ब्रेथ अनालायझर’ यंत्र

Last Updated:

ST Bus: प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. आता चालकांनी मद्यपान केल्यास बस सुरूच होणार नाही.

ST Bus: मद्यधुंद चालकांना बसणार लगाम, आता नव्या बसमध्ये ‘ब्रेथ अनालायझर’ यंत्र
ST Bus: मद्यधुंद चालकांना बसणार लगाम, आता नव्या बसमध्ये ‘ब्रेथ अनालायझर’ यंत्र
पुणे: राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील वर्षभरात एसटीच्या ताफ्यात नव्या बस दाखल होणार आहेत. या नव्या बसमध्ये चालकाजवळ ब्रेथ अ‍ॅनालायझर यंत्र बसवले जाणार आहे. या यंत्रणेमुळे चालकाने बस सुरू करण्यापूर्वी श्वास परीक्षण करणे बंधनकारक असेल. परीक्षणात मद्यपान केल्याचे आढळल्यास बस सुरू होणार नाही. नव्या बस खरेदी करताना ही यंत्रणा बसवण्याची अट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे मद्यपी चालकांवर नियंत्रण येणार असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेत वाढ होणार आहे.
प्रत्येक एसटी बसमध्ये ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’
एसटीमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. गावखेड्यांपासून ते शहरापर्यंत या सेवेशी अनेक नागरिक जोडलेले आहेत. प्रवाशांना सुरक्षित सेवा देणे हे एसटी प्रशासनाचे पहिले कर्तव्य मानले जाते. मात्र काही चालक कर्तव्यावर असताना मद्यपान करून बस चालवतात किंवा प्रवाशांशी गैरवर्तन करतात. अशा घटनांमुळे अपघात होऊन प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो.
advertisement
प्रशासनाने वेळोवेळी तपासणी मोहिमा राबवल्या असून, दोषी चालकांवर कारवाईही केली जाते. तरीही अशा घटना थांबलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी नव्या बस खरेदी करताना महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या काळात ताफ्यात दाखल होणाऱ्या प्रत्येक नव्या बसमध्ये चालकाजवळ ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ यंत्र बसवले जाणार आहे. चालकाने बस सुरू करण्यापूर्वी श्वास परीक्षण करणे आवश्यक असेल. परीक्षणात मद्यपान आढळल्यास बस सुरू होणार नाही.
advertisement
लवकरच एसटीच्या ताफ्यात आठ हजार नव्या बस
एसटीच्या ताफ्यात पुढील काही वर्षांत मोठी वाढ होणार आहे. पुढील पाच वर्षांत तब्बल 25 हजार बस ताफ्यात सामील करण्याची योजना असल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. पहिल्या टप्प्यात आठ हजार नव्या बस खरेदीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या नव्या बसमध्ये चालकाजवळ ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ यंत्र बसवले जाणार आहे.
advertisement
दरम्यान, सध्या एसटीच्या ताफ्यात जवळपास 14 हजार बस आहेत. त्यापैकी 12 हजार 500 बस विविध मार्गांवर धावत आहेत. नव्या बसच्या समावेशामुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि दर्जेदार सेवा मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
ST Bus: मद्यपी चालकांना बसणार लगाम, आता नव्या बसमध्ये ‘ब्रेथ अनालायझर’ यंत्र
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement