Chhatrapati Sambhajinagar: तिकीट काढले अन् सगळेच घाबरले, धावत्या बसमध्ये महिलेचं टोकाचं पाऊल, त्या कृतीने खळबळ
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये धावत्या बसमध्ये खळबळजनक प्रकार घडला आहे. महिलेने थेट टोकाचं पाऊल उचचल्याने खळबळ उडाली.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. प्रवास सुरू असताना महिलेनं थेट टोकाचं पाऊल उचललं. खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगावजवळ बुधवारी दुपारी 40 वर्षीय महिलेनं धावत्या बसमधून उडी घेतली. या घटनेने सोलापूर–धुळे महामार्गावर एकच खळबळ उडाली. कांताबाई योगेश मरमट असे देहाडे नगर, हर्सल सावंगी येथील मृत महिलेचं नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.
कन्नड आगाराची बस (क्रमांक एमएच 15, बीटी- 3038) बुधवारी दुपारी तीन वाजता कन्नड येथून छत्रपती संभाजीनगरकडे जात होती. गल्लेबोरगाव येथून या बसमध्ये कांताबाई बसल्या व त्यांनी वेरूळचे तिकीट घेतले. बस पळसवाडी परिसरातून जात असताना अचानक दरवाज्याकडे जाऊन त्यांनी धावत्या बसमधून उडी मारली. यात बसच्या मागील चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. वाहक व प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला काहीशी अस्वस्थ होती.
advertisement
अपघाताची माहिती मिळताच खुलताबाद पोलिस मनोहर पुंगळे, बीट जमादार राकेश आव्हाड, महामार्ग पोलिस सपोनि. इंगोले, रामनाथ भुसारे, राठोड, शांताराम सोनवणे, शरद दळवी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठविला. याप्रकरणी पोलिसांनी चालक, वाहक, तसेच प्रवाशांचे जबाब नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
advertisement
वाहक रंजना सोनवणे यांनी सांगितले की, “ गल्लेबोरगाव येथून महिला बसमध्ये बसलेली होती. महिला प्रवासभर शांत आणि काहीशी अस्वस्थ दिसत होती. आम्हाला काही समजण्याआधीच तिने दरवाज्याकडे जाऊन उडी घेतली.” चालक बळीराम राठोड यांनीही तत्काळ बस थांबवली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
October 30, 2025 9:33 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Chhatrapati Sambhajinagar: तिकीट काढले अन् सगळेच घाबरले, धावत्या बसमध्ये महिलेचं टोकाचं पाऊल, त्या कृतीने खळबळ


