Pune : बॅगा भरा, प्रवासाला लागा! पुण्यातून आजपासून जादा एसटी सुटणार; कुठे थांबणार अन् वेळ जाणून घ्या

Last Updated:

Pune ST Buses : दिवाळीच्या सणासाठी पुण्यातील एसटी प्रशासनाने आजपासून जादा बस सेवा सुरू केली आहे. स्वारगेट, वाकडेवाडी आणि पिंपरी-चिंचवड येथून अतिरिक्त बस प्रवाशांसाठी उपलब्ध राहतील

News18
News18
पुणे : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊल ठेपला आहे. बरेचजण मुंबई पुण्यातून गावीजाण्यासाठी निघतात आणि त्या प्रमुख साधन म्हणून बसची निवड करतात. यामुळेच दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रवाशांसाठी एसटी प्रशासनाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. आजपासूनच पुण्यातील स्वारगेट, वाकडेवाडी (शिवाजीनगर) आणि पिंपरी-चिंचवड येथून जादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या अतिरिक्त बस सेवा प्रवाशांच्या सोयीसाठी असून मुख्यत्वे बाहेरगावी जाणाऱ्या लोकांच्या गर्दीचा विचार करून नियोजन करण्यात आले आहे.
जाणून घ्या संपूर्ण बसचे वेळापत्रक
स्वारगेट येथून नियमित बस सेवेसह कोल्हापूर, जळगाव, मंगळवेढा यांसह कोकणात जादा बस सोडल्या जातील, तर वाकडेवाडी येथून मराठवाडा आणि खान्देश भागासाठी प्रवाशांना जादा बस सेवा उपलब्ध होणार आहे. पिंपरी-चिंचवड येथूनही मराठवाडा आणि विदर्भ भागासाठी जादा गाड्या चालवण्यात येणार आहेत. यंदा एकूण 598 अतिरिक्त बस सेवा राबविण्याचे नियोजन करण्यात आले असून, प्रवाशांना प्रवास अधिक आरामदायक आणि सुरक्षित होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
advertisement
दि. 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी शाळा संपल्यावर बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एसटी स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. स्थानकावर सुरक्षारक्षकांसह अतिरिक्त कर्मचाऱ्यांची टीम तैनात केली जाईल. तसेच प्रवाशांसाठी पाणी, चौकशी केंद्रे आणि इतर सुविधा वाढवण्यात आल्या आहेत, जेणेकरून प्रवाशांचा अनुभव सुखकर आणि सुरक्षित राहील.
advertisement
ऑनलाइन बुकिंग सुरू झाल्यानंतर प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून अनेक गाड्यांचे बुकिंग आधीच पूर्ण झाले आहे. त्यामुळे अतिरिक्त बस सेवा राबवून प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. स्वारगेट एसटी स्थानकातून सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि कोकण भागात 113 जादा बस सोडल्या जातील तर पिंपरी-चिंचवड येथून 396 आणि वाकडेवाडी येथून 80 जादा बस सेवा उपलब्ध होणार आहे.
advertisement
सुरक्षा व्यवस्थेतही विशेष लक्ष दिले गेले आहे. विशेषत शुक्रवारी रात्रीपासून दि. 16 आणि 17 ऑक्टोबर दरम्यान स्थानकावर वाढती गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्व उपाययोजना केल्या आहेत. या सुविधांमुळे प्रवासी दिवाळीच्या सणात गावी जाण्यासाठी सुखरूप आणि आनंददायी प्रवास अनुभवू शकतील.
या वर्षीच्या दिवाळीत एसटी प्रशासनाच्या या जादा बस सेवेमुळे प्रवाशांना जास्त वेळ वाचेल, गर्दी टळेल आणि प्रवास अधिक आरामदायक होईल. प्रवाशांसाठी हा आनंदाची आणि सोयीची बातमी ठरली आहे. दिवाळीच्या आनंदात प्रवाशांना गावी पोहोचण्याची सोय आणि सुरक्षितता यावर प्रशासनाने विशेष भर दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune : बॅगा भरा, प्रवासाला लागा! पुण्यातून आजपासून जादा एसटी सुटणार; कुठे थांबणार अन् वेळ जाणून घ्या
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement