Pune News : बापरे! पुणेकरांनी दिवाळीचा मुहूर्त साधत 'असं' काही केलं जे पाहून तुम्हीही म्हणाल...; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Last Updated:

Pune Diwali Vehicle Sales 2025 : दिवाळीच्या मुहूर्तावर पुणेकरांनी वाहन खरेदीचा उत्सव साजरा केला. आठ दिवसांत तब्बल 13 हजार 387 नवीन वाहनांची नोंदणी झाली. यंदा मागील वर्षाच्या तुलनेत वाहन खरेदीत वाढ झाली आहे अशी माहिती आरटीओकडून मिळाली.

News18
News18
पुणे : दिवाळीचा सण म्हणजे खरेदीचा उत्सवच असतो. त्यातही दसऱ्यानंतर वाहन खरेदीचा उत्साह अधिक वाढतो. यंदा देखील पुणेकरांनी दिवाळीच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात नवीन वाहने खरेदी केली आहेत. गेल्या आठ दिवसांत म्हणजे 8 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात तब्बल 13 हजार 387 नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे. ही संख्या मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास हजाराने जास्त आहे.
जीएसटीचा फायदा थेट ग्राहकांना; वाहन खरेदीत मोठी वाढ
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमती कमी झाल्या असल्याने नागरिकांनी खरेदीकडे अधिक उत्साहाने धाव घेतली आहे. दसरा, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज या शुभ मुहूर्तांवर लोकांना नवीन वाहन खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे या काळात शो-रूम आणि आरटीओ कार्यालयात खरेदीदारांची मोठी गर्दी दिसली.
या आठ दिवसांत झालेल्या नोंदणीत सर्वाधिक म्हणजे 8 हजार 763 दुचाकींची नोंदणी झाली आहे. गेल्यावर्षी ही संख्या 7 हजार 911 होती. त्यानंतर 2 हजार 786 कार, 546 रिक्षा, 471 टॅक्सी, 635 मालवाहतूक वाहने आणि 42 बस अशी नोंदणी झाली आहे. इतर श्रेणीतील वाहनांची संख्या 144 इतकी होती.
advertisement
साधारण पाहता या आकडेवारीवरून दिसून येते की पुणे आणि परिसरात दरवर्षी वाहन खरेदीत एक ते दीड हजारांची वाढ होत आहे. लोक नवीन वाहन खरेदी करण्यासाठी शुभ दिवसाची वाट पाहतात आणि त्याच दिवशी वाहन नोंदणी पूर्ण करून ते घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. यंदाची दिवाळी वाहन विक्रेत्यांसाठीही फायद्याची ठरली आहे. वाहन बाजारात पुन्हा एकदा चैतन्य परतले असून पुढील काही दिवसांतही ही वाढ कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : बापरे! पुणेकरांनी दिवाळीचा मुहूर्त साधत 'असं' काही केलं जे पाहून तुम्हीही म्हणाल...; जाणून घ्या नेमकं प्रकरण
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement