Pune Metro : पुणेकरांना मिळणार खास सव्हिर्स, महामेट्रोने घेतला मोठा निर्णय
Last Updated:
Pune Automated Metro Project : खडकवासला–स्वारगेट–खराडी मेट्रो मार्गावर आता पूर्णपणे स्वयंचलित मेट्रो धावणार आहे. महामेट्रोकडून त्यासाठी सविस्तर अहवाल तयार केला जात असून या मार्गावर चालकाविना 25 ट्रेन चालवण्याची योजना आहे.
पुणे : पुण्यातील खडकवासला–स्वारगेट–खराडी या महत्त्वाच्या मेट्रो मार्गाबाबत सतत चर्चा सुरू असते. हा प्रकल्प नेमका कधी सुरू होणार याची उत्सुकता नागरिकांना असतानाच आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे, या मार्गावर काम सुरू होण्याआधीच पूर्णपणे स्वयंचलित आणि अत्याधुनिक मेट्रो धाववण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे.
'ड्रायव्हरलेस' ट्रेनसाठी महामेट्रोचा सविस्तर अहवाल
महामेट्रो या प्रकल्पासाठी सविस्तर अहवाल तयार करत आहे. या मार्गावर 25 ट्रेन लोकोपायलटशिवाय म्हणजेच चालकाविना, आधुनिक यंत्रणेद्वारे चालवल्या जाण्याची शक्यता आहे. सध्या पुणे मेट्रोचे पिंपरी–चिंचवड ते निगडीपर्यंतचे काम जोरात सुरू आहे तर इतर मार्गांवरील कामे निविदा टप्प्यात आहेत. प्रस्तावित खडकवासला–स्वारगेट–हडपसर–खराडी हा सर्वात लांब मार्ग असल्याने त्यावर नवीन तंत्रज्ञान वापरण्याचा विचार केला जात आहे. या ट्रेन पूर्णपणे ऑटोमेटेड असतील, जशा दिल्ली आणि इतर काही शहरांमध्ये आधीच सुरू झाल्या आहेत.
advertisement
स्वयंचलित मेट्रोसाठी विशेष प्रकारच्या डब्यांची गरज असते. या डब्यांमध्ये लोकोपायलटसाठी स्वतंत्र केबिन नसते, उलट प्रवाशांना ट्रेन पुढे कशी जाते हे पारदर्शक काचेतून पाहता येते. अशा 25 नवीन अत्याधुनिक ट्रेन खरेदी करण्याची योजना आहे.
हडपसर-खराडीकरांसाठी मोठा दिलासा
view commentsया मेट्रो मार्गाला केंद्र सरकारची अंतिम मान्यता मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. मान्यता मिळाल्यानंतर तातडीने काम सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे. एकदा हा प्रकल्प पूर्ण झाला आणि मेट्रो धावू लागली की, सिंहगड रोड, हडपसर आणि खराडीसारख्या भागांतील रोजच्या वाहतूक कोंडीपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 03, 2025 12:13 PM IST


