Gautami Patil: रिक्षाचालकाच्या कुटुंबाने मागितले तब्बल 19 लाख, गौतमीने धाप टाकत सांगितला आकडा; अपघात प्रकरणाला नवं वळण

Last Updated:

माझ्या नावाची बदनामी करत आहे तर मी त्या कुटुंबाला भेटायला का जाऊ? असा सवाल देखील गौतमी पाटीलने या वेळी उपस्थित केला आहे.

Gautami Patil Car Accident
Gautami Patil Car Accident
पुणे :   प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कारचालकाने पुण्यात एका रिक्षाचालकाला धडक दिली होती. या अपघातामुळे गौतमी पाटील हिच्यावर अनेक गंभीर आरोप झाले. रिक्षाचालक कुटुंबीयांनी तर गौतमीवर मदतच केलीच नाही, असा आरोप केला. पण, अखेर आठवडाभरानंतर गौतमीने या प्रकरणावरून मौन सोडलं. रिक्षाचालक कुटुंबीयांना अपघातााच्या दिवशी दुपारीच मदत पुरवली होती. मात्र त्यांनी मदत नाकारत १९ लाख रूपयाची मागणी केल्याचा खळबळजनक दावा गौतमी पाटीलने केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत गौतमीने ही माहिती दिली आहे.
पुण्यात रिक्षा अपघात प्रकरणामुळे गौतमी पाटीलवर मागील काही दिवसांपासून अनेक आरोप झाले. अखेरीस पुणे पोलिसांनी ज्या ठिकाणी अपघात झाला, त्या मार्गावरील सगळे सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये गौतमी पाटीलही कारमध्ये नसल्याचं सांगत पोलिसांनी तिला क्लिन चीट दिली. मात्र त्यानंतर देखील गौतमीवर आरोप होत असून काही संघटनांकडून तिचे कार्यक्रम बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला. त्यानंतर अखेर गौतमीने पत्रकार परिषद घेत या सगळ्या प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे.
advertisement

कुटुंबांच्या नातेवाईकांनी केली पैशांची मागणी

गौतमी पाटील म्हणाली, माझी काही चूक नसताना मला गुन्हेगार ठरवलं जात आहे. माझा या घटनेची काही संबध नाही पोलिसांनी ही हे सांगितले आहे. त्या कुटुंबाला मदत देण्यासाठी माझे भाऊ गेले होते पण त्यांनी मदत नाकारली आहे. अपघातग्रस्त कुटुंबांच्या नातेवाईकाकडून वेगवेगळ्या प्रकारची मागणी करण्यात येत आहे. कुणी 19 लाख तर कुणी 20 लाख रुपये मागितले जात होते असे माझे मानलेले भाऊ मला सांगत आहेत. आता कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याने सगळं कायद्यानेच होणार आहे.
advertisement

चंद्रकातदादा जे बोलले त्यामुळे मला वाईट वाटलं : गौतमी पाटील

माझा या घटनेची काही संबंध नाही पोलिसांनी देखील हे सांगितले आहे. त्या कुटुंबाला मदत देण्यासाठी माझे भाऊ गेले होते पण त्यांनी मदत नाकारली. पोलिसांनी जेव्हा बोलवले तेव्हा त्यांना सहकार्य केले आहे आणि करणार आहे. चंद्रकातदादांनी ते वक्तव्य केलं त्यामुळे मला वाईट वाटलं, पण सगळेच माझ्या बाबतीत बोलतात... सगळे मला वाईटच बोलतात. मला सातत्याने ट्रोल केले जात आहे. मी नाचले तरी वाईट होते आणि नाही नाचले तरी वाईटच आहे . मी जर त्या वेळी तिथे असते तर नक्कीच मी हे प्रकरण वाढवून दिले नसते. आता जे काही कायदेशीर आहे त्यानुसार चालेल, असे गौतमीने सांगितले.
advertisement

माझ्या नावाची बदनामी करत आहे तर मी का भेटायला जाऊ? गौतमीचा सवाल

गौतमी पुढे म्हणाली, माझ्या नावाची बदनामी करत आहे तर मी का जाऊ? चालक कुठे गेला होता हे मला माहिती नाही .चालकाची चूक झाली हे मला मान्य आहे .त्यानी त्यावेळी तिथ मदत करायला हवी होती. ही घटना घडल्यामुळे मी त्या चालकाशी बोलत नाही . मला जाणीवपूर्वक यात अडकवले जात आहे असे वाटत आहे. शो बंद पडले तर अनेक जण माझ्यावर अवलंबून आहेत, त्यांचे हाल होतील . ज्यावेळी घटना घडली तेव्हा मी मुंबईत होते घटना घडल्यानंतर चालकाशी माझं अजून ही बोलणे झाले नाही. माझ्याकडे जी माहिती होती ती सगळी मी पोलिसांना दिली आहे.
मराठी बातम्या/पुणे/
Gautami Patil: रिक्षाचालकाच्या कुटुंबाने मागितले तब्बल 19 लाख, गौतमीने धाप टाकत सांगितला आकडा; अपघात प्रकरणाला नवं वळण
Next Article
advertisement
Bollywood Movies: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
    View All
    advertisement