तुकोबांची पालखी येणार अन् वैष्णवांचा मेळा जमणार! निवडुंग्या विठोबा मंदिरात अशी सुरुये तयारी, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
विद्युत रोषणाईने उजळलेला मंदिर परिसर, उत्सव मंडपाची उभारणी, वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी असलेल्या सभागृहाची झालेली साफसफाई, मंदिरात केलेली देखणी सजावट अशी जय्यत तयारी श्री विठ्ठल मंदिरांमध्ये करण्यात आली आहे.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : पुणे शहराच्या मध्यवस्तीमध्ये नाना पेठेत असलेल्या निवडुंग्या विठोबा मंदिर आहे. आषाढी वारीच्या दरम्यान संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा इथं दरवर्षी मुक्काम असतो. आता पांडुरंगाच्या वारीचे वेध लागले आहे. त्यामुळे निवडुंग्या विठोबा मंदिरात संत तुकारामांची पालखी येण्याचे हे 329 वे वर्ष आहे. म्हणून यावर्षी पालखीचे नियोजन कसे आहे आणि या मंदिराचा इतिहास काय आहे, हे जाणून घेऊयात.
advertisement
रोषणाईने उजळलं मंदिर -
विद्युत रोषणाईने उजळलेला मंदिर परिसर, उत्सव मंडपाची उभारणी, वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी असलेल्या सभागृहाची झालेली साफसफाई, मंदिरात केलेली देखणी सजावट, अशी जय्यत तयारी श्री विठ्ठल मंदिरांमध्ये करण्यात आली आहे.
Ashadhi Wari 2024: वारकऱ्यांसाठी देहूत QR Code! पैशांचं नाही, सुविधांचं
संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त श्री पालखी विठ्ठल मंदिर आणि श्री निवडुंग्या विठोबा मंदिर येथील तयारी अंतिम टप्प्यात आहे. मंदिरांमध्ये चैतन्यमय वातावरण आहे. यंदा दोन्ही मंदिरांतील व्यवस्थापनाकडून पालखी सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे.
advertisement
दोन मैत्रिणींनी केला अनेक अडचणींचा सामना, पण न खचता आज याठिकाणी उभं केलं अनोखं स्वयंपाकघर
उत्सव मंडपाच्या उभारणीसह विद्युत रोषणाई, सजावटीचे कामही पूर्ण झाले आहे. श्री पालखी विठ्ठल मंदिरात 30 आणि 2 जूनला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे. तसेच संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचाही मुक्काम नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिरात असणार आहे. लाखो भाविकही पालखीच्या दर्शनासाठी येत असतात.
advertisement
हे मंदिर 800 वर्ष इतकं जुनं आहे. येथील मूर्ती निवडुंगाच्या झाडाखाली सापडल्यामुळे ही स्वयंभु मूर्ती आहे. स्वतः तुकाराम महाराज या मंदिरात भजन किर्तनासाठी येत होते, असा इतिहासदेखील आहे. प्रतिपंढरपूर म्हणून देखील याची ख्याती पाहायला मिळते, अशी माहिती मंदिराचे विश्वस्त विशाल धनवडे यांनी दिली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
June 27, 2024 7:30 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
तुकोबांची पालखी येणार अन् वैष्णवांचा मेळा जमणार! निवडुंग्या विठोबा मंदिरात अशी सुरुये तयारी, VIDEO