Ashadhi Wari 2024: वारकऱ्यांसाठी देहूत QR Code! पैशांचं नाही, सुविधांचं

Last Updated:

दरवर्षी वारीत राज्यभरातून हजारोंच्या संख्येनं वारकरी सहभागी होतात. त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी केली जाते.

वारकऱ्यांसाठी सुविधा
वारकऱ्यांसाठी सुविधा
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : वारकरी वर्षभर ज्या सोहळ्याची आतुरतेनं वाट पाहतात ती पंढरपूरची वारी आता अगदी अंगणात येऊन ठेपलीये. 28 जून रोजी मानाच्या पालख्या निघतील आणि विठूरायाच्या भेटीचा प्रवास सुरू होईल.
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूतून प्रस्थान होईल. त्यासाठी देहू नगरपंचायतीच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आलीये. विशेष म्हणजे यंदा प्रथमच भाविक आणि वारकऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या सोयी, सुविधांचा स्थानदर्शक नकाशा उपलब्ध करण्यात आला आहे. फलकांवर क्यूआर कोड स्कॅनर प्रसिद्ध करण्यात आलंय. त्यामुळे भाविकांना आणि वारकऱ्यांना सहज सोयीसुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती नगरपंचायतीच्या वतीनं देण्यात आलीये.
advertisement
दरवर्षी वारीत राज्यभरातून हजारोंच्या संख्येनं वारकरी सहभागी होतात. त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी केली जाते. यंदा देहू परिसरात वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर, फिरती शौचालयं, अग्निशमन वाहनं, दवाखाना, सरकारी एनडीआरएफ (जीवरक्षक जवान), वाहनतळ, स्थानदर्शक फलक, इत्यादी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून त्या त्या सुविधेवर क्यूआर कोड स्कॅनर दिलेलं आहेत.
advertisement
स्कॅनरमुळे भाविकांनी त्या ठराविक ठिकाणापासून सुविधा किती अंतरावर आहे याची माहिती मिळेल. हा नकाशा नगरपंचायत प्रशासनाच्यावतीनं पहिल्यांदाच तयार करण्यात आला आहे. यासाठी नगरपंचायत प्रशासनाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत. देहूत विविध ठिकाणी क्यूआर कोड स्कॅनरचे फलक उभारण्यात आले आहेत. तसंच सर्व विणेकरी, दिंडेकरी यांच्या मोबाईलवर पाठवण्यात आल्याची माहितीही नगरपंचायत प्रशासनानं दिली आहे.
मराठी बातम्या/पुणे/
Ashadhi Wari 2024: वारकऱ्यांसाठी देहूत QR Code! पैशांचं नाही, सुविधांचं
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement